श्री सिद्धिविनायक पतसंस्था संस्थेचा अर्थ मंथन कार्यक्रम संपन्न
श्रीरामपूर-
संस्थेच्या 18 व्या वर्धापन निमित्त हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून अपूर्वा हॉल येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सीईओ श्री अमोल जोशी यांनी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी संस्थेच्या अठरा वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतला संस्थेने डिजिटल प्रणाली स्वीकारली असुन क्यूआर कोड,NEFT/RTGS,मोबाइल बँकिंग अप,एस.एम.एस या बँकेप्रमाणे सर्व सेवा आम्ही देत असून आज संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन संस्थेच्या सर्व हितचिंतकासमोर करताना विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे चेअरमन श्री वासुदेव काळे यांनी आपल्या मनोगतात ठेवीदारांनी जास्त अर्थसाक्षर होणे आवश्यक आहे अनेक ठेवीदार जास्त व्याज साठी मुद्दल ही गमावून बसतात शासनाने सर्व पतसंस्थेच्या 9.30 % व्याज दर ठरवून दिले आहे यापेक्षा जास्त व्याजदर जर कोणती संस्था देत असेल तर ती तुमची फसवणूक करीत असल्याचे सांगितले आजच आमच्या संस्थेच्या ठेविना लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंड मार्फत संस्थेच्या ठेवीना संरक्षण मिळाल्याचे सांगितले. आमचे संस्थेचा व्यवसाय हा 100 कोटी पर्यंतचा झाला असून आम्ही आत्ताच व्हिजन 2025 तयार केले आहे संस्थेत येणारी प्रत्येक ठेव आमच्या विश्वासावर येत आहे त्यामुळे ती योग्य व्यक्तीस कर्जाद्वारे वाटप होण्यासाठी आम्ही प्रत्येक व्यक्तीचा सिबिल रिपोर्ट ,व्हिजिट रिपोर्ट घेतो संस्थेने 95 टक्के कर्ज वाटप ही तारणी कर्ज स्वरुपात केली आहे यावेळी संस्थेचे अनेक हितचिंतक उपस्थित होते यावेळी संस्थे विषयी बोलण्यासाठी श्रीमती मालपाठक सुजाता मॅडम, बापूसाहेब पटारे, शेखर पाठक सौ.मंदाकिनी पिसोळकर व दिलीप काळे यांनी आपले मनोगत मांडले कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कोकरे यांनी केले आभार श्री.दिगंबर कुलकर्णी व कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालक एडवोकेट श्री अजय चौधरी यांनी केले संस्थेचे कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक व सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment