आरोग्यमित्र सुभाष गायकवाड
श्रीरामपूर – येथील नागेबाबा प्रतिष्ठाणचे आरोग्यमित्र सुभाष गायकवाड यांना मुंई येथील जय महाराष्ट्र पत्रकार, वृत्तपत्र लेखक व कवी महासंघाच्यावतीने दिला जाणारा महाराष्ट्र स्वाभिमान गौरव पुरस्कार नुकताच माजी मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
गायकवाड यांनी आरोग्यक्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाची दखल घेऊन आयोजकांनी त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चारूशिला देशमुख होत्या. यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री दिपाली सय्यद, कामगार नेते अभिजीत राणे, आदिनाथ थत्ते, डॉ. प्रविण निचत, मकरंद वांगणेकर, सिने अभिनेते प्रसाद तारकर, पत्रकार राजेश जाधव, गुरूदत्त वागदेकर, स्वागताध्यक्ष प्रकाश जाधव, संयोजक सुरज भोईर आदी उपसथित होते.
सुभाष गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून नागेबाबा मल्टीस्टेटचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमित्र म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी आतापर्यंत ८०० रूग्णांना चार कोटीहून अधिक रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. शिवाय रूग्णांना मदत करण्यासाठी ते स्वतः पुणे, मुंबई, शिर्डी, कोपरगाव, अहमदनगर आदी ठिकाणी स्वतः रूग्णांसमवेत जातात. त्यांना सर्व प्रकारचे मदत मिळवून देतात. या पूर्वी त्यांना २२१ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराबद्दल गायकवाड यांच्यावर समाजातील विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment