🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

सोयाबीन पिकाची 'यलो मोझ्याईक ' रोगाने झालेल्या नुकसीचा पंचनामे करण्याची छावा संघटनेची मागणी


श्रीरामपूर-:सध्या तालुक्यात अतिवृष्टीचे पंचनामे सुरू आहेत. या पंचानाम्यासोबतच सोयाबीनपिकावरील पिकावर 'यलो मोझ्याईक' (पिवळा व्हायरस) रोगामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील करावेत, अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.

प्रांताधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पटारे यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. त्यातच तालुक्यातील कारेगाव सह अनेक गावांत सोयाबीन पिकावर 'यलो मोझ्याईक' (पिवळा व्हायरस) रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या जुलै-ऑगष्ट महिन्यापासून या रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

 सोयाबीनवर अनेक फवारण्या करून रोग नियंत्रणात नाही आला ,आता त्या सोयाबीन पिकांना शेंगा पण खूप कमी प्रमाणावर आल्याआहेत त्यामुळे एकरी उत्पादनात 70 ते80 टक्के घट येणार आहे.


अतिवृष्टी चे पंचनामे चालू आहेत काही भागात पाऊस कमी आहे ,पण तिथे 'यलो मोझ्याईकरोगाचा प्रादुर्भाव आहेत्या रोगग्रस्त सोयाबीन चे पण पंचनामे करावेत.

निवेदनावर शैलेश वाघजिल्हा वाहतूक आघाडी प्रमुखलक्ष्मण कसबेविद्यार्थी आघाडी प्रमुखबाबा भांडसंतोष भागडेडॉ रवी महाडिकडॉ अरविंद बडाखनितीन गवारेऋषिकेश मोरगेविजय ढोकचौळेमुकुंद लबडेसचिन पवारकिरण गायधनेअरुण शिंदेकैलास पवारदादासाहेब झिंझ आदींची नावे आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारीतहसीलदारजिल्हाकृषी अधिकारीतालुका कृषी अधिकारी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Comments system