सप्टेंबर-ऑक्टोबर : अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी नगर जिल्ह्याला २९१ कोटी
अहमदनगर (प्रतिनिधी) - सप्टेंबर-ऑक्टोबर, २०२२ मध्ये नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूर परस्थितीमुळे शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून ६७६ कोटी ११ लाख ४७ हजार रुपयांचा निधी नाशिक व पुणे आयुक्तांमार्फत वितरीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला २९१ कोटींचा लाभ मिळणार आहे.
जिरायतीच्या पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना ६ हजार ८०० रुपये प्रती हेक्टर ऐवजी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्यात येणार आहे. तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रती हेक्टर ऐवजी २७ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. तर बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी
१८ हजार प्रती हेक्टर ऐवजी ३६ हजार रुपये प्रती हेक्टर देण्यात येणार आहेत. महसूल आणि वनविभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील सुमारे ४ लाख ३८ हजार ३४२ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मदतीची रक्कम लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्यात येणार आहे लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment