भारतीय प्रजासत्ताक दिन
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला.... फार मोठे स्वातंत्र्य समर लढावे लागले.... या स्वातंत्र्याच्या यज्ञामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली... सर्वस्वाचा त्याग केला..... तेव्हा कुठे आपला देश स्वातंत्र्य झाला... याचे जाण आणि भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.... जात-पात-धर्म यापेक्षा देश महत्त्वाचा असतो हे प्रत्येकाच्या मनात रुजले पाहिजे.... देशभक्ती, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रसेवा या मूल्यांची रुजवण आणि जोपासना झाली पाहिजे.... घराघरात आणि मनामनात राष्ट्रनिष्ठा वाढली पाहिजे.... आपला देश, आपला राष्ट्रध्वज आणि आपली राष्ट्रीय प्रतीके हे खऱ्या अर्थाने सर्व भारतीय नागरिकांची आण-बाण-शान आणि अभिमान बनली पाहिजेत.... स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मनामनात जिवंत राहिल्या पाहिजेत...
किती जणांनी घरदार सोडले
किती जणांनी सर्वस्व अर्पिले...
किती जणांनी रक्त सांडले
किती जणांनी बलिदान दिधले...
त्यांची आठवण थोडी काढूया
त्यांचा त्याग समजून घेऊया...
समर्पणाचे महत्त्व जाणून घेऊया
स्वातंत्र्यलढा आठवूण पाहूया...
26 जानेवारी 2023 रोजी आपण आपला प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष झाले. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात-अज्ञात नायक, क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी यांनी केलेला त्याग.... दिलेले बलिदान.... लक्षात राहावे. स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सर्व देशभक्तांनी चेतवलेले स्फुल्लिंग सर्व भारतीय जनसामान्य माणसाच्या मनात कायम तेवत राहावे.... आपल्या दैदिप्यमान भारतीय इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण व्हावे.... या उदात्त आणि विधायक उद्देशाने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत दिनांक 11 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात आले.
या अनुषंगाने विचार करताना यावर्षीचा प्रजासत्ताक दिन विशेष महत्त्वाचा आहे. समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता या तत्त्वावर आधारलेल्या आणि सर्व भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार आणि हक्क प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी याच दिवसापासून झालेली आहे. खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 पासून भारतात प्रजेच्या हाती सत्ता आली. सर्वांना समान हक्क, अधिकार आणि महत्त्व असणाऱ्या लोकशाही तत्त्वांची रुजवणूक झाली. म्हणून 26 जानेवारी या दिवशी 'प्रजासत्ताक दिन' साजरा केला जातो.
बांधव आम्ही एकमेकांचे सांगते
ते भारतीय संविधान आहे
समता, न्याय, स्वातंत्र्य रुजवते
ते भारतीय संविधान आहे.....
आपल्या देशात विविध जातीचे, धर्माचे, संप्रदायाचे लोक राहतात.... आपल्या देशात अनेक राज्य आहेत ... केंद्रशासित प्रदेश आहेत... वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी भाषा बोलली जाते..... वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा जपला जातो... आपल्या देशात अनेक बाबतीत विविधता आहे... तरीसुद्धा देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय अस्मिता याबाबतीत आपण सर्वजण एक आहोत... यालाच विविधतेत एकता म्हणतात... आपला भारतीय इतिहास आणि आपल्या परंपरा यांना खूप मोठा दैदिप्यमान वारसा आहे... आपल्या देशात प्रचंड नीतिमत्ता रुजलेली आहे... मूल्य, तत्व, विचार, सहिष्णुता, संवेदनशीलता यांचा भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठा प्रभाव आहे... समता, न्याय, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता ही भारतीयांच्या मनामनात आहे.... भारतामध्ये अत्यंत भावनिक आणि संवेदनशील माणसे राहतात. इथे परस्परांवर प्रेम, आपुलकी, माया-जिव्हाळा लावला जातो. भारतात खऱ्या अर्थाने माणुसकी जपली जाते. मानवता हाच खरा धर्म मानला जातो.
असा उदात्त इतिहास आणि वर्तमान असणाऱ्या देशाचे आम्ही नागरिक आहोत. याची जाणीव ठेवून. राष्ट्रध्वजाचा आणि भारतीय संविधानाचा उचित मान-सन्मान करून .... भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करूया.
संविधान आमची आण आहे
संविधान आमचा प्राण आहे...
संविधान आमची शान आहे
संविधान आमचा अभिमान आहे...
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त तिरंगा या राष्ट्रध्वजास आणि भारतीय संविधानास मानवंदना देऊयात...
प्रजासत्ताक दिन......
केला सर्वस्वाचा त्याग
देश स्वातंत्र्या झुंजले
दिली प्राणाची आहुती
हित देशाचे रक्षिले
एकाहुन एक थोर
असे महात्मे अपार
प्रत्येकाचा त्याग थोर
किती मोठे उपकार
वाचा फोडली अन्याया
इंग्रजांशी लढा दिला
एका एका माणसाचा
स्वाभिमान जागा केला
केला अखंड संघर्ष
देशा स्वातंत्र्य मिळाले
केला अभ्यास अमाप
संविधान साकारले
भारताच्या हितासाठी
केंद्रबिंदू प्रजा केली
प्रजासत्ताक आणले
देशा लोकशाही दिली
न्याय, स्वातंत्र्य, बंधुता
आम्ही मूल्य जोपासली
सारी समता स्थापुनी
शोभा देशाची वाढली...
(टिप लेखक हे उत्तम व्याख्याते व निवेदक आहेत.)
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
लेखक, कवी, कथाकार, गझलकार, समीक्षक

No comments:
Post a Comment