कळ आतल्या जिवाची......!
प्रशस्त, देखणे, टुमदार, सर्व सोयीसुविधांनी युक्त घर आहे ; पण त्या घराला घरपणच उरलेले नाही. सोन्यासारखी माणसे आहेत. आई, बाबा, भाऊ, बहीण पत्नी, मूलंबाळ सगळी-सगळी नाती आहेत. पण त्या नात्यात ओलावाच उरला नाही. प्रत्येक नात्यात ओलावा असावा, तो तसाच टिकून राहावा यासाठी कुणी प्रयत्नही करत नाही. प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार मला काय गरज आहे....? माझ्याकडे सगळं काही आहे; मला कोणाचीही गरज नाही. पण लक्षात घ्या हा भ्रम आहे.. निव्वळ भ्रम... हे वेळोवेळी सिद्ध झालंय.... कसला पैसा...?... कुणाची धनदौलत...? कुठला मानसन्मान...? कुठली पद, प्रतिष्ठा....? कसली स्थावर-जंगम मालमत्ता...? कशाची प्रसिद्धी...? कुठला बढेजावपणा...? एवढे सगळे मिळाले म्हणजे आयुष्य सुखी आणि समृद्ध झाले असे नाही. किती आणि कुठंपर्यंत या सर्वांचा उपयोग...? या सर्वांपेक्षाही आयुष्यात आणखीन काही महत्त्वाचे असते....? भौतिक सुखाने सुख मिळाल्याचा केवळ आभास निर्माण होतो. प्रत्यक्ष समाधान मिळत नाही.
सुख, समाधान, आनंदासाठी आपल्या माणसांचे प्रेम, माया, ममता, आपुलकी, वात्सल्य आणि त्यांचा आनंददायी सहवासच आवश्यक असतो. पैसा, धनदौलत, प्रतिष्ठा मानसन्मान तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तुमच्या डोक्यावरून मायेने हात फिरवू शकत नाही. तुम्हाला कुरवाळू शकत नाही. तुम्हाला कुशीत घेऊ शकत नाही. तुमचे दुःख समजून घेऊ शकत नाही. तुमच्या वेदना त्यांना कळत नाहीत. त्यासाठी आपली माणसेच लागतात.
अभिमान वाटावा असं एक तरी नातं हवं.... ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की अक्षरशः बांध फुटावा.... कुणाजवळ तरी हंबरडा फोडून रडता यावं... कुणाला तरी सगळं सुख-दुःख सांगता यावं....आयुष्यात कोणीतरी हवं त्याचं सगळं ऐकून घ्यावं आणि ज्याला आपलं सगळं काही सांगावं... कोणीतरी हवं ज्याला आपलं असणं हवंहवंस वाटावं. ज्याला आपलं रुसणं नकोसं वाटावं. आपण आनंदातच राहावं. आपल्या आयुष्यात दुःख येऊच नये आणि आलेल्या दुःखाला सामोरे जाण्याचे धैर्य त्यांनी आपल्याला द्यावं. आपल्या असण्याचा ज्याच्यावर फरक पडावा. आपल्या नसण्याने ज्याला विरह वाटावा. अशी हक्काची जिवाभावाची माणसं आपलं दुःख समजू शकतात. आपल्याला समजू शकतात. या सगळ्या समजून घेण्यामुळेच आपण सुखी,समाधानी, आनंदी राहू शकतो.
कशासाठी जगतो आहोत आम्ही ? आणि कुणासाठी जगतो आहोत आम्ही ? या दोन प्रश्नांची उत्तरे अगदी मध्यरात्री जरी कोणी विचारली तरी ती सांगता यावीत.. या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत ; तर मात्र माणूस नाईलाजाने आत्महत्येकडे वळतो. आजच्या धावपळीच्या एकविसाव्या शतकात माणसाचे जीवन कसे झाले आहे. यावरील एक सुंदर कविता आठवते. कुणाची आहे माहित नाही पण छान आहे.
आऊटडेटेड झाले आयुष्य सारं
स्वप्नही डाऊनलोड होत नाही
संवेदनांना व्हायरस लागलाय
दुःख सेंड करता येत नाही
जुने पावसाळे उडून गेलेत
डिलीट झालेल्या फाईल्स सारखे
आणि घर आता शांत असतं
रेंज नसलेल्या मोबाईल सारखे
हँग झालेल्या पीसी सारखी
मातीची स्थिती वाईट
जाती माती जोडणारी
कुठेच नाही वेबसाईट
एकविसाव्या शतकातील
पीढी भलतीच क्युट
कॉन्टॅक्ट लिस्ट वाढत गेली
संवाद झाले म्युट
कम्प्युटर च्या चीप सारखा
माणूस मनानं खुजा झालाय
अन मदर नावाचा बोर्ड त्याच्या
आयुष्यातून वजा झालाय
फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह मध्ये
आता संस्कारांनाच जागा नाही
फाटली मने सांधणारा
इंटरनेटवर धागा नाही
विज्ञानाच्या युगातील
केवढी मोठी चूक
रक्ताच्या नात्यांनाही लागते
व्हाट्सअप आणि फेसबुक
एका घरात राहत आहोत पण संवाद विसरत चाललो आहोत. हे केवढे दुर्भाग्य आहे. कुटुंबातील माणसे आहेत ; पण कोणत्या न कोणत्या कारणामुळे एकमेकापासून दुरावलेली आहेत. नातेवाईक भरपूर आहेत तरीदेखील अभिमान वाटावा असे एकही नातं नाही. प्रत्येक जण आपापल्या तोऱ्यात, गर्वात, अहंकारात मीपणात काठोकाठ बुडाला आहे. ढीगभर मित्र आहेत पण मन मोकळे करावे असा एकही नाही. अंत:करण मोकळे करावे. हृदयात साठलेल्या सगळ्या वेदना दाखवाव्यात. काळजाला टोचणाऱ्या गोष्टी सांगाव्यात. मनाच्या वेदनादायी जखमांवर फुंकर घालावी. खदखदून हसावे. रडून एकदाच मोकळे व्हावे. असा एकही कुटुंबातील सदस्य, एकही नातेवाईक आणि एकही मित्र नसणे. म्हणजे आपल्या जीवनाचं सर्वात मोठे अपयश आहे.
सांगु कशी कुणाला
कळ आतल्या जीवाची
चिरदाह वेदनेचा
मज शाप हाच आहे

(टिप लेखक हे उत्तम व्याख्याते व निवेदक आहेत.)
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
लेखक, कवी, कथाकार, गझलकार, समीक्षक
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
लेखक, कवी, कथाकार, गझलकार, समीक्षक
No comments:
Post a Comment