🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

दोन दिसाची रंगत-संगत....

दोन दिसाची रंगत-संगत.... 

              दिवसामागून दिवस निघून जातात. महिने-महिने करत वर्ष ही जाते. अनेक वर्ष होतात. माणसाच्या आयुष्यातवेगवेगळ्या वळणावरवेगवेगळी माणसे येतात आणि जातात. याच अनेक माणसांमध्ये काही माणसं हृदयाच्या तळापर्यंत पोहोचतात. काहीचा सहवास हवाहवासा वाटायला लागतो. काही मात्र क्षणभराच्या सहवासासाठी ही नको वाटतात. अनेक माणसेअनेक स्वभाव. ‘मूर्ती तितक्या प्रवृत्ती.’ प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धतीप्रत्येकाचे वेगवेगळे विचार. माणसं आणि त्यांचा स्वभाव आवडण्यासाठी किती क्षणाचा सहवास अपेक्षित असतो...?  हे निश्चित सांगता येत नाही. कुणाचा क्षणभराचा सहवास ही सुखावून टाकतो. कायम स्मरणात राहतो.

हा स्नेह वंचना की,

काहीच आकळेना
आयुष्य ओघळोनी….

मी रिक्तहस्त आहे

                 कोण कोणासोबत किती काळ राहीले...?  याला फारसं महत्त्व नसतं. तर त्याच्या असण्यानेत्याच्या वागण्याने-बोलण्याने माणसाच्या मनावर किती खोलवर परिणाम झाला.  हे महत्त्वाचं असतं. कोणताच माणूस चांगला किंवा वाईट नसतो. ती आपली संकल्पना असते. तो आपला दृष्टिकोन असतो. त्याच्या वागण्या-बोलण्याचे पडसाद असतात. सगळीच माणसंसगळ्याच परिस्थितीतसारखी वागत नाहीत. तसंच प्रत्येक माणूस प्रत्येकाशी सारखा वागत नाही. व्यक्ती-व्यक्तीनुसारविविध घटकानुसारत्याचं वागणं-बोलणं बदलत असतं. माणसाचा स्वभाव वस्तुनिष्ठ नसतोतर व्यक्तिनिष्ठ असतो. म्हणूनच एकाच माणसाबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतात.

काटा रुते कुणाला,

आक्रंदतात कोणी
मज फूल ही रुतावे…..

 हा दैवयोग आहे

                   बारीक-सारीक प्रत्येक गोष्टींचा हिशोब आपण ठेवतो. ईश्वराने दिलेल्या ‘अमूल्य भेटीचा हिशोब आपण ठेवत नाही. खरंतर ईश्वराची ‘अमुल्य भेट’ म्हणजे आपलं ‘जीवन. ते वारेमाप पद्धतीने आपण उधळत असतो. ‘टाईमपास’ या नावाखाली वाट्टेल ते करतो. कधी विचारच करत नाही कीआपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण किती महत्त्वाचा आहे. दिवसा दिवसांनी संपत जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. प्रत्येकाचेच आयुष्य मर्यादित आहे. मर्यादित आयुष्यात जेवढं चांगलं वागता येईलतेवढं वागलं पाहिजे. जेवढे भरभरून बोलता येईलतेवढं बोललं पाहिजे. साधं-साधंसोपं- सोपंसरळं-सरळंजीवन जगलं पाहिजे. विनाकारण गुंतागुंत वाढवायची नाहीजेवढे गुंते सोडवता येतील तेवढे सोडवायचे. काही समस्या सुटत नाहीत... तिथे विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. आयुष्यात अनेकांच्या स्मरणात राहूअसं जीवन जगायचं.

दोन दिसाची रंगत-संगत....!*   

No comments:

Post a Comment

Comments system