श्रीरामपूर-येथील बालरोगतज्ञ डॉ. प्रकाश मेहकरकर यांची कन्या नवजात शिशु व बालरोगतज्ञ डॉ. पुजा मेहकरकर यांना ऑस्ट्रेलियातील शासकीय हॉस्पीटल किंग एडवर्ड नवजात शिशुतज्ज्ञ याच विषायातील मानाची सर्वोची पदवी एफआरएसीपी ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली.
डॉ. पुजा या गेल्या ४ वर्षापासून ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध किंग एडवर्ड मुलांचे हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी एमडीडीएनबी ही पदवी प्राप्त केलेली आहे. नुकतेच त्यांना नवजात शिशुतज्ज्ञ याच विषायातील मानाची सर्वोची पदवी एफआरएसीपी ही पदवी देवून गौरविण्यात आले. ही पदवी मिळविणाऱ्या डॉ. पुजा या पशचिम महाराष्ट्रातील एकमेव महिला डॉक्टर ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. कुटे यांनी हार्दिक अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment