🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

चित्रकार रवी भागवत, निवेदक प्रसन्न धुमाळ यांना कलारत्न पुरस्कार


चित्रकार रवी भागवत, निवेदक प्रसन्न धुमाळ यांना कलारत्न पुरस्कार

       श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या उम्मती फाउंडेशन यांच्यावतीने दिला जाणारा कलारत्न पुरस्कार या वर्षी सुप्रसिद्ध चित्रकार रवी भागवत व सुप्रसिद्ध निवेदक प्रसन्न धुमाळ यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

शहरातील नगर परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वसंतराव जमधडे होते. प्रमुख पाहुणे म्हणुन दिवाणी न्यायाधीश निवास खराडेन्यायाधीश प्रियांका पटेलपरीक्षाविधीन न्यायाधीश आसिया शेख उपस्थित होते. तसेच करियर मार्गदर्शनासाठी डॉ. योगेश पुंडप्रा.जलाल पटेलवैभव ढूस आदी मान्यवर आवर्जुन उपस्थित होते. यावेळी शहरातील सामाजिक एकताबंधुत्व व शांतता कायम राहावी या प्रामाणिक उद्देशाने मौलाना इर्शादउल्लाह कासमीह.भ.प.कृष्णानंदजी महाराजग्यानी अनोखसिंग मिस्कीन फादर ज्यो गायकवाड आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

     यावेळी उम्मतीचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला यांच्या संकल्पनेतून श्रीरामपुर शहरातील विविध क्षेत्रातील 28 आयडॉल्स यांना समाजरत्नशिक्षणरत्नआरोग्यरत्नकलारत्नपत्रकाररत्नरक्षारत्नअध्यात्मरत्न अश्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रकार भागवत यांनी चित्रकलेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गुरू चित्रकार भरतकुमार उदावंत यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रांच्या माध्यमातून गरजू रूग्णांना लाखो रूपयांची आर्थिक मदत मिळवून दिली आहे. शिवाय एड्स जनजागृती, व्यवसमुक्ती, वीज बचत, पाणी बचत, हुंडाबळी, वाहतुक नियमन आदी सामाजिक विषयांवर त्यांची राज्यभर असंख्य चित्र प्रदर्शने भरली आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत फाऊंडेशनच्यावतीने त्यांना कलारत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

          उपजिल्हा रूग्णालयात एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र विभागाचे समुपदेशक, उपजिल्हा रूग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सुप्रसिद्ध निवेदक धुमाळ यांनी एड्स जनजागृती, सर्वरागे निदान शिबिरांचे आयोजन, रूग्णालयाच्या माध्यमातून रूग्णांना ट्रस्टची मदत मिळवून देणे, कारोना काळात विशेष लसी करण सत्राच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी शिबीरे आयोजित केली आहेत्त. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रास्ताविक अ‍ॅड.आरीफ शेख यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. तौफिक शेख यांनी केले. सुत्रसंचालन प्रसन्नन धुमाळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी युसूफ लखाणीअसलम सय्यदफिरोज पठाण इरफान शेखशाकीफ शेखइसाक शेखफारूक मेमननितीन बनकर,डॉ. सुदर्शन रानवडेडॉ.अहतेशाम शेखशाहरुख बागवानअलीम बागवानमाजिद मिर्जा आदिनीं परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment

Comments system