आनंदवारी........
संपूर्ण पृथ्वीतलावरील एक अलौकिक आणि अवर्णनीय सोहळा म्हणजे महाराष्ट्रातील पंढरपुर वारी सोहळा होय. या वारी सोहळ्याला आनंदवारी असे ही म्हणतात. कारण या वारीमध्ये कोणत्याही भौतिक सुखाची अपेक्षा न ठेवता असेल त्या परिस्थितीमध्ये आनंद वाटतोच. कोणतीच गैरसोय वाटत नाही.

कोणताच त्रास होत नाही. कोणती उणीव, कमतरता जाणवत नाही. पाऊस, थंडी, ऊन, वारा याची तमा नसते. कुठलीच काळजी किंवा चिंता उरत नाही. मनातील सर्व दोष, दुर्गुण, षडरिपू आपोआप नष्ट होतात. ध्यानी, मनी आणि स्वप्नी खऱ्या अर्थाने पांडुरंग असतो, वसतो आणि दिसतो.
संपत्ती सोहळा
न आवडे मनाला
लागला टकळा
पंढरीचा....
जावे पंढरीसी
आवडे मनाशी
आषाढी एकादशी
वृत्त हे.....
तुका म्हणे ऐसी
आर्त ज्याचे मनी
त्याची चक्रपाणी
वाट पाहे.....
पायी चालत, दिंडी, झेंडा, पताकासह भक्ताच्या सहवासामध्ये, टाळ-मृदुंगाच्या नादात हरिनामाचा गजर करत भौतिक सुखाची कसलीच अभिलाषा न ठेवता केली जाते ती वारी..... वारीला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. वारीला हजारो वर्षाचा इतिहास आहे. अनेक देव देवता, वैष्णव, आचार्य, संत आणि महंत यांनी वारी केली आहे. श्री शिवशंकराला पहिले वारकरी म्हणून संबोधले जाते. पहिली वारी भगवान शंकराने माता पार्वती, देव श्री गणेश आणि नंदी समवेत केली. वारी करून भेटीला आलेल्या शंकर भगवानाला बघून पंढरीनाथ पांडुरंगाला खूप आनंद झाला. म्हणून पांडुरंगाने प्रभू शंकराला डोक्यावर घेतले. याच प्रकारच्या शंकर भगवान समवेत असणाऱ्या विठ्ठलाचे दर्शन आजही पंढरपुरात होते. पंढरपुरात सर्व देवांची भेट होते. गरुड खांबावरती गरुड विराजित आहे. तर उजव्या बाजूला सनकादिक ब्रह्मा आहे. डाव्या बाजूला अकरा रुद्र अवतारासह शंकर भगवान आहेत. तर पाठीमागच्या बाजूला इंद्रदेवासह समस्त देवी-देवता, गंधर्व, किन्नर विठ्ठलाचे स्तवन करत आहेत. भगवान श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलरामजी सुद्धा पंढरपुरी आलेले आहेत. पंढरपुरात बलरामजीने स्नान केले म्हणून याला संकर्षण तीर्थ असेही म्हणतात. म्हणून पुराणात पंढरीचा उल्लेख त्रिशुळावरी काशी, चक्रावरी पंढरी.... असा केला जातो. पंढरपूरचा महिमा फार मोठा आहे. पांडुरंगाचा महिमा तर आपण सर्वजण जाणतोच. पांडुरंगाच्या सकाळच्या काकड आरती साठी सगळे देवी देवता जमा होतात.....
सुरवरांची दाटी जमली
जोडूनी हात
त्रिशूळ डमरू घेऊन आला
गिरीजेचा कांत....
श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटापासून महाद्वारापर्यंत भक्तजनांची अलोट गर्दी असते. सगळे भक्तजन विटेवर उभ्या असणाऱ्या सावळ्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आतुरलेले असतात.
मनुष्य जन्मामध्ये आयुष्यात एकदा तरी जीवनाचा सार सांगणारी वारी प्रत्येकाला घडली पाहिजे. वारीची महती अनुभवाशिवाय कळत नाही... वारीत गेल्यावर कळते कशाप्रकारे ठाई ठाई भगवंत वसलेला आहे. माणसा माणसांमध्ये भगवंत आहे. प्रत्येक सुखदुःखाच्या प्रसंगांमध्ये भगवंत आपल्या सोबत आहे.
वारीमध्ये सहभागी झालेली प्रत्येक व्यक्ती म्हणजे माऊली. वारी मधले संपूर्ण वातावरण माऊलीमय झालेले असते. वारीत दुसरे कोणते नातेच शिल्लक उरत नाही. सगळेजण एकमेकाची माऊली म्हणजे आई. संवादही त्याच वात्सल्यपूर्ण मायेचा. एकमेकाला संबोधन सुद्धा माऊली या नावानेच केले जाते.
बरेच जण म्हणतात वारीमध्ये सर्व प्रकारची माणसे असतात. हौसे, नवसे, गवसे वगैरे वगैरे.... पण प्रत्यक्षात तसे नसावे. वारीमध्ये सहभागी होणारा व्यक्ती कोणत्याही उद्देशाने वारीत सहभागी झाला असला तरी एकदा या भक्तीमय वातावरणात आल्यानंतर त्याचे हृदय परिवर्तन होतेच. प्रत्येक व्यक्ती श्रद्धावंत आणि निष्ठावंत होतोच. भक्तिमय वातावरणामध्ये संपूर्णपणे रंगून जातो. विठ्ठलाच्या नामात तल्लीन होतो. जन्मोजन्मीचे दुःख विसरून जातो. मनातल्या सगळ्या शंका, कुशंका, दोष, भीती, चिंता आपोआप संपून जातात. शुद्ध अंतकरणाने आणि श्रद्धायुक्त भक्तीने विठ्ठलाच्या पंढरपुराकडे आगळ्या-वेगळ्या ओढीने वाटचाल सुरू होते.

ठाई ठाई भगवंत दिसायला लागतो. माणसा-माणसाच्या रूपात भेटायला लागतो. प्रत्येकाच्या हृदयात जाणवायला लागतो. बरेच जण या वारीमध्ये आपल्याजवळ असणाऱ्या सर्व भौतिक सुख सुविधांचा त्याग करून, आपल्या सर्व धनसंपत्ती पासून दूर राहून संपूर्ण विरक्तपणे वारी करण्याचा प्रयत्न करतात. जवळ कुठलीच भौतिक सुविधा सोबत घ्यायची नाही. सोबत अजिबात पैसे ठेवायचे नाहीत. फक्त जीवनावश्यक वस्तू सह वारी करायची. तरीही कुणाचे काही अडत नाही. काही नडत नाही.
भगवंताची लिला एवढी अपरंपार आहे. एरव्हीच्या दैनंदिन व्यवहारासाठी क्षणाक्षणाला आपल्याला भौतिक सुविधांची व पैशाची गरज भासते. पण वारीत या कुठल्याच गोष्टीची गरज लागत नाही. हा अनेकांचा अनुभव आहे. वारीत कुणीही उपाशी राहत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपात विठ्ठल जेऊ घालतोच. प्रत्येक भक्ताची काळजी घेतोच. प्रत्येक भक्ताची सोबत करतोच. एकदा या भक्तीमय वातावरणात सहभागी झाल्यानंतर जीवनातल्या सगळ्या व्यथांचा विसर पडतो. दैनंदिन जीवनात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता नष्ट होतात.
व्यवहारांमध्ये आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी खूप मोठे नियोजन, प्रयोजन, आयोजन आणि संयोजन करावे लागते. वारी सोहळ्याचे वैशिष्ट्य असे आहे की इथे कुणाला आमंत्रण नाही. कोणताही गवगवा नाही. कोणतीही जाहिरात नाही. कुणालाही कोणतेही प्रलोभन नाही. कुणाचाही वेगळा असा आदरसत्कार, मानसन्मान नाही. तरीही लाखोच्या संख्येने लोक सहभागी होतात. आनंदाने चालतात. उत्साहात भजन, कीर्तन आणि हरिनामाचा गजर करतात. कितीही चाललो तरी त्याचा क्षिण नसतो. तहान-भूक आणि विश्रांती याचा विसर पडतो. पाऊलांना आणि मनाला फक्त एकच ओढ असते. ती म्हणजे पंढरपूरची आणि विठ्ठलाच्या दर्शनाची. वारीत चालताना अचानक पाऊलांना गती येते....वारकरी आनंदाने नाचायला लागतात, फुगड्या खेळतात, पळायला लागतात, मोठमोठ्याने गजर होतो तो याच विठ्ठल दर्शनाच्या ओढीने.....

वारी मधील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे ज्यावेळी पंढरपूर जवळ येते आणि आबाल-वृद्ध सर्व वारकरी विठ्ठल भेटीच्या असह्य ओढीने धावायला लागतात. सर्व भक्ती डोळ्यात एकवटून विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस बघतात.... आणि भक्तिमय प्रेमाच्या अश्रू धारा डोळ्यातून घळघळा वाहयला लागतात.... आणि प्रत्येक वारकऱ्याच्या मनाला वाटते....
याचसाठी देवा
घ्यावा पुन्हा पुन्हा जन्म....
एवढ्या दिव्य ओढीने पंढरपुरात पोहचलेले सर्व वारकरी श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारीला (दर्शन रांग) लागतात. सतत 24 तास दर्शन सुरू असून सुद्धा पंचवीस-पंचवीस, तीस-तीस तास दर्शनासाठी लागतात. तरीही पडत्या पावसात, थंडीमध्ये ओल्या चिंब देहाने निस्सीम भक्तीने वारकरी आनंदाने दर्शन रांगेमध्ये उभे राहतात. कोणताच त्रास वाटत नाही. कोणतीच गैरसोय वाटत नाही. मनाला कोणतीही खंत वाटत नाही. कोणताच क्षिण वाटत नाही. तहान-भुकेचा विसर पडतो. एवढ्या श्रद्धेने, भक्तीने श्री विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात. कंठ दाटून येतो. देह सद्गदित होतो. डोळ्यातून भक्तीमय अश्रूधारा वाहू लागतात. जेव्हा विठ्ठलाच्या चरणावर एका क्षणासाठी डोके टेकवतो. त्या क्षणी धरणाचे दरवाजे उघडावेत तशा पद्धतीने डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मन भरून येते. हृदयातून हंबरडा फुटतो. भगवंत डोक्यावरून हात फिरवत असल्याचे जाणवते. देव प्रेमाने विचारपूस करतो. देव अंत:करणातले सगळे दुःख जाणून घेतो. अशा या विठ्ठल भेटीने जन्माचे सार्थक होते. म्हणून श्रद्धावंत भक्तासाठी पंढरपूर मध्ये साक्षात भगवंत आहे, विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती नाही. या भक्तीयुक्त ओढीने देवाच्या दर्शनाला गेलात तर विठ्ठल चरणी डोके टेकवल्या-टेकवल्या डोळे भरून येतातच. श्रद्धावंताच्या जन्माचे सार्थक होतेच. वारकऱ्यासारखी श्रद्धा आणि भक्ती मनात ठेवली तर पांडुरंग भेटतोच. म्हणून या सर्व अर्थाने ही आनंदवारी आहे. आणि हा सुख सोहळा स्वर्गी नाही......
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी

No comments:
Post a Comment