बांधकाम मजुरांचे अर्जावर सही शिक्के नाही दिले तर ग्रामसेवकवर होणार कारवाई-नितीन पटारे
छावा संघटनेच्या आंदोलनास यश
श्रीरामपूर
-ग्रामसेवकांच्या अडेलतट्टू भुमिकेमुळे हेळसांड होत असलेल्या बांधकाम मजुरांनी येथील पंचायत समिती कार्यालयात मोठ्या संख्येने जमून ठिय्या दिला. छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेत्तृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. अखेर गटविकास अधिकाऱ्यांच्या सहीचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात होते
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या. त्याअंतर्गत नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना मानधन, अपघात विमा, वैद्यकीय विमा, पत्नीला मातृत्व लाभ, वृद्धत्वाचा लाभ, काम करताना अपघात होऊन कामगाराला स्थायी किंवा अस्थायी अपंगत्व आल्यास लाभ मिळतो, काम करताना अपघातात मृत्यू झाल्यास मृत्यू लाभ, विवाहासाठी आर्थिक सहाय्य, मुलांना शिष्यवृत्ती असे अनेक लाभ मिळातात.
योजनेच्या लाभासाठी कामगाराची नवीन नोंदणी तसेच नुतणीकरणासाठी ऑनलाईन अर्ज भरताना ग्रामसेवकांचा दाखला आवशक असतो. मात्र मजूर नसताना ग्रामसेकांना हाताशी धरून अनेक धनदांडग्यांनी या योजनांचा लाभ घेतल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. ग्रामसेवकांच्या चौकशा सुरू झाल्या. कारवाईचा बडग्याला घाबरत ग्रामसेवकांच्या संघटनेने शासनाकडून कार्यपद्धती दिली जात नाही तोपर्यंत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. यामुळे ग्रामीण भागातील गरजू मजुरांची मोठ्या प्रमाणात हेळसांड सुरू आहे. बांधकाम मजुरांच्या नोंदणीसाठी अनेकदा अध्यादेश निघाले. प्रारंभी २०१५ मध्ये नोंदणी ग्रामसेवकांकडून करण्यात यावी असे म्हंटले. तरीही ग्रामसेवकांनी आडमुठेपणाची भुमिका घेत मजुरांची गैरसोय केली.
याबाबत छावाचे पटारे यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन कामात कसूर करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र दखल न घेतल्याने हे आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर ही सही शिक्के देण्यास ग्रामसेवकांनी नकार दिल्याने छावाचे जिल्हाद्यक्ष नितीन पटारे यांनी दादाभाऊ गुंजाळ , उपमुख्यकार्यकारी अधिकारी ग्रामपंचयत विभाग जिल्हापरिषद अहमदनगर याची भेट घेऊन आपल्याकडील लेखी पत्र असून देखील ग्रामसेवक सही देतनाही,त्यापत्रानुसार ठिय्या आंदोलन करून , गटविकास अधिकारी प्रवीण सिणारे यांनी नोंदणीची कार्यवाही लवकर सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ही ग्रामसेवक सही देत नसल्याचे पटारे यांनी निदर्शनास आणून दिले असता ,दादाभाऊ गुंजाळ यांनी नावानिशी तक्रार द्या आम्ही कारवाई करण्यास तयार आहोत असे तोंडी आश्वासन दिले आहे,
आता तालुक्यातील बांधकाम मजुरांनी ग्रामपंचयत मध्ये जाऊन लेखी कारण घ्यायचे आहे की आमच्या अर्जावर सही देण्यास कोणत्या प्रकाची अडचण आहे ,त्यानुसार गटविकासअधिकारी यांचे मार्फत जिल्हापरिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडे तक्रारदाखल करावयाची आहे ,
त्यानंतर ग्रामसेवकवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचे नितीन पटारे यांनी प्रसिद्ध दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे,

No comments:
Post a Comment