🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कारेगावचे सरपंच अपात्रतीन वर्षापूर्वीचे अवैध गौण खनिज प्रकरण भोवले


श्रीरामपूर-

       तीन वर्षांपूर्वी गौण खनिज उपसा करून अवैध रितीने खासगी जागेत टाकल्याचे प्रकरण कारेगावचे सरपंच आनंद वाघ यांना चांगलेच भोवले. नाशिक येथील विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी वाघ यांना अपात्र ठरवून सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश जिल्हा परिषदेस दिले.


       कारेगाव येथे २०२१ साली योगेश उंडे यांच्या विहिरीच्या उत्खननादरम्यान मोठ्या प्रमाणात मुरूम काढण्यात आला. वाघ यांनी सरपंच पदाचा गैर वापर करीत, महसूल विभागाची परवानगी न घेता हा सुमारे पाच ब्रास मुरूम उचलून सोपान दगडू भापकर यांच्या जमिनीत टाकला. शिवाय भापकर यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनीत बेकायदेशीर रित्या रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला.


       याबाबत भापकर यांनी तत्कालिन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे तक्रार केली. तहसीलदारांनी टाकळीभानचे मंडलाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची चौकशी करून पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यांनी अहवाल सादर केल्यानंतर तहसीलदारांनी दि. १८ एप्रिल २०२२ रोजी वाघ यांच्यास तेरा जणांना १ लाख ४१ हजार रूपयांचा दंड ठोठावला. या आदेशाविरोधात वाघ व इतर १३ जणांनी


 प्रांताधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केले. त्यावर सुनावणी होऊन १२ एप्रिल २०२३ महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८ (७) नुसार उत्खनन व वहन दंड प्रक्रिया पार पाडून तहसीलदारांनी दिलेला आदेश जैसे थे ठेवला

या निर्णयाच्या अनुषंगाने कारेगावातील सामाजिक कार्यकर्ते भास्कर बारसे यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त यांच्याकडे सरपंच वाघ यांच्या अपात्रतेची मागणी केली. त्यावर सुनावणी होऊन ८ ऑक्टोबर रोजी वाघ यांना अपात्र ठरविण्याबाबतचा निकाल दिला


No comments:

Post a Comment

Comments system