🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

ग्रामसेवक पदाधिकारी यांची तालिबानी हुकूमत घोटाळा उघडकीस ?

कधीकाळी एकलहरे नाव मनमानी घोटाळ्यामुळे संपूर्ण तालुक्यात गाजले होते. त्यानंतर आता पुन्हा एकलहरे  गावात मोठ्याप्रमाणात घोटाळा 

१. पैसे घेऊन घरकुल योजनेचा लाभ (यादीत नाव घेणे)

२. ग्रामपंचायत मध्ये आकृती बंधातील रीक्त पदावर घेणेसाठी पैशांची (चीरीमीरी) माघणी करणे.

३. भुमी अंतर्गत गटार मध्ये अपहार करणे, काम अपुर्ण ठेवणे.

४. जल संवर्धन योजणेमध्ये अपहार करण व M.B बुकप्रमाणे काम न करणे.

५. ग्रामसभा न भरवणे स्वतःच्या हिशोबाने स्वतःच्या भावाच्या बंगल्यात दार लावून सभा भरवणे

६. ग्रामसभा गनना न करता स्वतःच्या हिशोबाने स्वतःचा फायदा घेणे (फक्त पदाधिकारी व सरपंच व त्यांचे भाऊ सदर सभेमध्ये हजर राहणे)

७. रोजगार सेवकाची नियुक्ती न करणे.

८. योजने संधर्भात लोकांमध्ये माहिती न देणे (माहित लपवुन ठेवणे)

९. ग्राम निधीचा वैयक्तीक कामासाठी वापर करणे.

१०. सतत ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवणे.

११. निवीदा बातमी पेपर मध्ये जाहिरात न टाकणे आणि जाहिरात टाकली तरी जिल्हा बाह्य वृत पत्रात जाहिरात टाकणे.

१२. जवळच्या (बैठकीतल्या) ठेकेदारास वर्क ऑर्डर देणे.

१३. दिवे वत्प बदलणे असल्यास स्वतः सरपंच पतीला काम देणे, ज्या कामाचे प्रशिक्षण नाही ते काम देणे,

१४. ८ अ मध्ये खाडाखोड करून स्वतःच्या हिशोबाने कोणाचेही नांव लावणे किंवा क्षेत्र कमी जास्त करणे.


हा घोटाळा 
उघडकीस येत असून या घोटाळ्यात आता गावागावातील पदाधिकारी, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी तसेच पंचायत समितीचे काही कर्मचारी यांचा सहभाग असल्याचे आरोप तसेच मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत असल्याने आपल्याला घरकुल मिळणार नाही हे गृहीत धरून ज्या, ज्या बोगस लाभार्थ्यांनी घरकुलाचा लाभ मिळवून घेण्यासाठी पार्त्या व पैशाची देवाणघेवाण केलेली होती त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते आता सगळे सत्य चारचौघात, चौकाचौकात सांगताना दिसून येत आहेत.

गोरगरीब, भूमिहीन, बेघर, हात मजूर व इतर बेघर लोकांसाठी शासनातर्फे पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, जाहीर करून ज्या लोकांजवळ घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसेल अशा लोकांना जागा विकत घेण्यासाठी पंडित दीनदयाल सहाय्यता निधीतून रक्कम देण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

या योजनेतील लाभार्यांना लाभ मिळवून देण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करतांना शासनाने ठरवून दिलेल्या निकसा पूर्ण न करता  ग्रामपंचायतीने दवंडी न देता दार लाऊन  ग्रामसभा घेऊन निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी दवंडी देऊन ग्रामसभेत  वाचून दाखवल्यावर सत्य कळेल काही हरकती आल्यास त्याचा निपटारा करुन योग्य व गरजू लाभार्थ्यांची यादी ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करून लाभ मिळवून द्यायला हवा परंतु ग्रामसभा कधी घेतली नसल्याचे जनता आरोप करत आहे

परंतु घरकुल लाभार्थ्यांची निवड करतांना (दुसऱ्याच ते कार्ट अन आपला तो बाळ्या) भविष्यातील येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवत बऱ्याचशा ठिकाणी आपपल्या कार्यकर्त्यांना, हौश्या, नौश्यांना खुश ठेवण्यासाठी घरकुल यादीत पदाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर ग्रामसभेत न वाचता  पदाधिकाऱ्यांच्या सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या यादीत घोळ करुन योग्य व गरजू लाभार्थ्यांना वंचित ठेवत मर्जीतील लोकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गैरप्रकार समोर येत असून गावागावातून मोठ्या प्रमाणात तक्रारी समोर येत आहेत.

असाच काहीसा गैरप्रकार श्रीरामपुर तालुक्यातील एकलहरे  गावात  घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत करण्यात आला असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे घरकुल लाभापासून वंचित झालेल्या शेकडो लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी श्रीरामपुर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून घरकुल यादीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.


या निवेदनात एकलहरे येथील ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामविकास अधिकारी व संबंधित लोक प्रतिनीधी यांनी अनुसूचित जमातीच्या वित्त वर्षीय एस.इ.सी.सी. २०२१ नुसार मंजुर झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचीत ठेवण्याच्या उद्देशाने बऱ्याच अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळूनये म्हणून एका बाजुला हेतुपुरस्कर या पूर्वी घरकुल लाभ मिळाला आहे' शेती नसतांना बागायती शेती आहे, सदर कुटुंब सधन आहे अशी खोटी माहिती लेखी स्वरूपात पंचायत समितीच्या कार्यालयास सादर करून खोटी व खोडसाळ माहीती पुरवून अनुसूचित जमातीच्या लोकांना जाणीवपूर्वक लाभापासून वंचीत ठेवून दुसरीकडे निवड / निकष १ ते १३ यामध्ये न बसणारे सधन, श्रीमंत, बागायतदार, एकच घरातील चार, चार लाभार्थी तसेच हेतुपूर्वक आपपल्या नातेवाईकांची, कार्यकर्त्यांची, हौश्या, नौश्यांची निवड करून बोगस लाभार्थ्यांना लाभ देत असल्याचे तक्रारी निवेदनात नमूद केले आहे.

तसेच जे खरे  गरजु लाभार्थी आहेत त्यांना वंचीत ठेवण्यात आले असुन सदर प्रकार अतिशय गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करत खोटी माहिती बनवून खऱ्या लाभार्थ्यांना वंचित ठेवणाऱ्या संबधीत कर्मचारी व लोक प्रतिनीधींची चौकशी करुन सदर कर्मचारी / लोकप्रतिनीधी यांच्यावर अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायदा १९८९ सुधारीत कायदा २०१५ कलम ३ (१) क्यु नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, व सत्यता तपासून गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यात येवून बोगस लाभार्थी यांचे १ ते १३ निकष तपासून त्यांची देखील चौकशी करण्यात यावी. असे न झाल्यास सदर प्रकरणात  तिव्र आंदोलन छेडण्यात येईल व या आंदोलनापासून होणारे नुकसान, तसेच कायदा क सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ग्रामपंचायत व पंचायत समितीची राहील अश्या आशयाचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले असून या निवेदनाच्या प्रती अधिक माहिती साठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हापरिषद अहमदनगर, मा. उपविभागीय अधिकारी श्रीरामपुर , आल्या आहेत.याबाबत इंडियन न्यूज कडून एकलहरे येथे भेट देऊन सत्यता जाणून घेतली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. कारण एकलहरे येथील घरकुल लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी ग्रामपंचायतीने रितसर जाहीर निवेदन अर्थात (दवंडी) देऊन ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत लाभार्थ्यांची निवड करण्यात यावी. या ग्रामसभेत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या साक्षीने व संमतीने बरेच लाभार्थ्यांची निवड करण्यात येऊन निवड झालेल्या लाभार्थ्यांची यादी वाचून दाखवण्यात यावी . तसेच त्यांची नावे ग्रामपंचायतीच्या कार्यालयात माहिती फलकावर लावण्यात यावी .

ही हेराफेरी करण्यासाठी काही लोकांनी वाहत्या गंगेत हात धुऊन घेतल्याची जोरदारपणे चर्चा होत असून काही लोकांनी या घरकुल लाभार्थ्यांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ओल्या पार्त्या तसेच दोन हजार रुपयांपासून तर दहा रुपयांची खैरात वाटल्याची चर्चा आहे. परंतु ही खैरात घेणारे दलाल कोण हे शोधून काढणे व खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment

Comments system