🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

गावातील जनतेने सावधानता बाळगावी


गावातील जनतेने  सावधानता बाळगावी
वांबोरी (प्रतिनिधी )- वांबोरी येथील एकाच फोन रिपेअर करायला टाकला असून देखील त्याचे सोशल मिडिया अकाउंट हॅक झाल्याचे प्रतिष्ठित जनते कडून म्हणले जात आहे गावांतील मुलांचे सोशल आयडी व मोबाईल फोन हॅक होत असुन सर्वांना कळवण्यात  येते की  

APK 🗄️ 🗃️ नावाने कोणत्या ही व्हॉट्सअँप ग्रूप मध्ये फाईल आल्यास ओपन करण्याचा प्रयत्न करु नये 
अन्यथा ॲप ओपन केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो 
त्याच बरोबर गुगल मार्फत टू स्टेप व्हेरिफिकेशन ऑन करुन घ्यावा त्याने तुमची पासवर्ड सिक्युरिटी ही वाढेल व हॅक होणे थांबेल 

सतर्क राहा सुरक्षित रहा

याचं सारखा प्रकार अंगणवाडी सेविकांचे मोबाईल हँक करुन मोबाईल डाटावरुन गावातील महीलांना फोन करुन पैसे लुटण्याचा नविन फंडा सुरु झाला असुन कुणीही अशा अमिषाला बळी पडू नये असे अवाहन इंडियन न्यूज मार्फत  केले आहे                                     काही दिवसापूर्वी बेलापुर खूर्द येथील अंगणवाडी सेवीका जया पुजारी यांचा मोबाईल हँक करुन गावातील महीलांची माहीती घेवुन त्यांना फेक काँल करण्यात आले तुमचे अनुदान मंजुर झाले आहे पैसे पाठविण्यासाठी फोन पे ओपन करा माहीती भरा ओटीपी टाका अशा सुचना देण्यात येतात बेलापुर खूर्द येथील पाच सहा महीला या अमिषाला बळी पडल्या त्यांचे पैसे गेले आता गळनिंब येथील सौ शितल सुनील वाघ या महिलेची आठ दिवसापूर्वी प्रसूती होऊन मुलगा झालेला असून त्या महिलेला आज जाटे वस्ती अंगणवाडी येथील सर्व माहिती सांगून अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे नाव सांगून तुमच्या बाळाचे सात हजार रुपये मंजूर झाले असून तुम्हाला ते फोन पे ला पाठवायचे आहे. असे सांगून फोन पे सुरू करण्यास सांगितले व नोटिफिकेशन पाठवून तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला घेता येईल. असे सांगून पाच हजार रुपये फोन पे ने काढून घेतले. या प्रकारच्या अनेक घटना ग्रामिण भागात घडत आहेत या बाबत कुणीही तक्रार करत नाही हा सर्व प्रकार फेक आसुन शासन कुठल्याही प्रकारे फोन पे द्वारे अनुदान पाठवत नाही शासनाचे जे अनुदान येते ते सरळ आपल्या बँक खात्यावर येते त्यामुळे कुणीही या अमिषाला बळी पडू नये  ग्रामीण भागातील महिलांनी असे फोन कॉल आल्यानंतर संबंधित व्यक्तीना किंवा आम्हाला फोन करावा. व कोणत्याही अमिषाला बळी पडू नये. असे अवाहन इंडियन न्यूज यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Comments system