🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

पिंजरा लागेल का ? कार्यवाही होईल का ?

एकलहरे प्रतिनिधी: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवडी परिसरात व शेजारच्या वाड्या-वस्त्यांवर बिबट्याने पुन्हा शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी गाय शेळ्या मेंढ्या सह कुत्र्यावर हल्ला केला आहे
परिसरातील शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नासिर जागीरदार यांच्या मालकीच्या शेतीत त्यांच्या पाळीव कुत्र्या वरच हल्ला केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे परिसरातील शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांनी वनविभागाकडे वारंवार पिंजरा लावण्याची मागणी दोन महिन्यापासून केली असूनही याकडे वन विभागाचे दुर्लक्ष करत आहे.

आठवडी परिसरात राहत असलेले शिंदे कुटुंबीय यांच्या मुलावर नाव यश शिंदे याच्यावर हल्ला करण्यास आलेल्या बिबट्यापासून वाचवण्यासाठी त्यांचा कुत्रा मध्ये पडला असता कुत्र्यावर हल्ला करून त्याला फक्त केला आहे सदरची बातमी वनाधिकारी पवार यांना दिली असता मी गावी आलो आहे असे बोलत लावूननंतर.  पघु. अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.

हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही होईल का असा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे

वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून या बिबट्याला व त्याच्या दोन पिल्लांना जेरबंद करावे अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा नसिर जागीरदार सह, शाहीर शेख, अल्ताफ शेख, सद्दाम शेख, आरिफ शेख, समीर शेख, अनिल माळी, दिलीप, राजू, शफिक शेख, बळी मोरे, घायतडक , सर्व ग्रामस्थ व अन्य शेतकरी बांधवांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Comments system