शेतकरी संघटनेच्या अनिल औताडे यांचा आरोप
श्रीरामपूर-अशोक सहकारी साखर कारखान्याचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर ऊस उत्पादक सभासद व कामगारांनी मागील गेल्या तीस वर्षापासून विश्वास टाकला. परंतु त्यांच्याकडून मागील दहा वर्षापासून वेळेत ऊस उत्पादकांना व कामगारांना घामाचे दाम दिले गेले नाही नाही. एफ आर पी व्यतिरिक्त पेमेंट मिळालेले नसल्याने आजपर्यंत महसुली उत्पन्नात तूट आलेली आहे. आजही कारखान्याचा संचित तोटा २८कोटी रुपये असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल औताडे यांनी केला आहे.
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गाळप हंगाम २००९ ते १० मध्ये एफ. आर. पी १२५० असताना ७५० रुपये एफ.आर.पी पेक्षा ज्यादा दिले. अंतीम दर२००० रुपये मिळाला. त्या वेळी साखर २२०० रु प्रतिक्विंटल विकली गेली. गाळप हंगाम २०२०-२१ रु चा एफ .आर.पी २२०० असून साखरेचे दर ३५०० रु आहेत. गत गाळप हंगाम २००९-१० च्या तुलनेत गाळप हंगाम२०२०-२१ साठी एफ.आर.पी व्यतिरिक्त ८०० ते १०००हजार रुपये अंतिम पेमेंट दिपावली पूर्वी देणे शक्य आहे. तसेच कामगारांचे ऊस उत्पादकांप्रमाणे सर्व थकीत पगार दीपावली पूर्वी करावे. गाळप हंगाम २०२०-२१ ची सरासरी रिकव्हरी साखर, मळी व इथेनॉल अशी सर्व मार्गांनी मिळून १२.२७ टक्के मिळाली आहे. त्याप्रमाणे१० टक्के रिकव्हरी ला २९५० रु आधिक २.२७ टक्क्यांचे चे ७०० रूपये असे एकूण ३६०० रूपयेतोडवाहतूक ६४० रु म्हणजे ३०५० रु एफ.आर.पी निघत असून त्याप्रमाणे पहिले पेमेंट देण्याची घोषणा करून सभासदांच्या कामगारांच्या हित रक्षणासाठी अशोकच्या संचालक मंडळाने धाडस दाखवावे असे आवाहन औताडे यांनी या निवेदनात केले आहे.
निवेदनावर अनिल औताडे, युवराज जगताप, हरिभाऊ तुवर, शरद पवार, बबनराव उगडे, दिलीप औताडे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक व अल्लाऊद्दीन इनामदार आदींच्या सह्या आहेत.
No comments:
Post a Comment