🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

शेतकरी नुकसान भरपाई व वसुली थांबविण्यासाठीछावाचा जिल्हाधिकारी कार्यालयालावर बैलगाडी मोर्चा



 

श्रीरामपूर-अतिवृष्टी चे पंचनाम्यासाठी अधिकारी येईपर्यत खळे झाले तरी पंचनामा करावा ,तसेच ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी ने झालेल्या नुकसानीचे पंचनामे आदेश देणे तसेच सर्व प्रकारच्या कर,कर्ज,पाणीपट्टी ,ग्रामपंचयत थकबाकी वसुलीस स्थगिती मिळणे साठी जिल्हाधिकारी कार्यलयावर अखिलभारतीय छावा संघटनेच्या वतीने जिल्हाअध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली भव्य बैलगाडी मोर्च्या काढण्यात आला.  यावेळी घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणानून गेले. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश अध्यक्ष पंजाबराव काळेसंपर्क प्रमुख प्रतापसिंह कांचन,संघटक अशोकराव चव्हाण,जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव मोरेनगर तालुकाअध्यक्ष भाऊसाहेब वाडेकर,तालुकाअध्यक्ष विजय बडाख ,रवींद्र पठारे,महिला जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई सांगळे ,संपर्क प्र आशिष खंडेलवालआदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत ऑगस्ट -सप्टेंबर महिन्यात नगरपाथर्डी,शेवगावतालुक्यातील अतिवृष्टी,ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन झालेल्या पशुधन हानी,पीक नुकसान भरपाई साठी पंचनामे सुरू आहेत तलाठीग्रामसेवक,कृषिसहयक शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहचू पर्यत काही शेतकऱ्यांनी पाण्यातुन  सोयाबीन सोंगुण खळे केले कारण सोयाबीन फुटून काहीच हाती आले नसते म्हणूनसोयाबीन ,बाजरी,उडीत,मूग,भुईमूग,मका खळे झालेले पंचनामे व्हावेत. ऑक्टोबर महिन्यात झालेला पाऊस हा आपल्या प्रशासकीय भाषेत अवकाळी असतो म्हणून आवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश द्यावेतदि ०७/०९/२०२१ च्या पत्रा नुसार पाथर्डीशेवगाव,नगर तालुक्यातील पशुधन हानी साठी जिल्हापरिषदेच्या योजनेतून पशुधन खरेदीसाठी पुरग्रस्त म्हणून दाखल देऊन सादर योजनेत प्राधान्याने पशुधन हानी झालेल्याची लाभार्थी म्हणून इतर कोणतेही निकष न लावता निवड करावी तसे पत्र जिल्हापरिषदेच्या मुखकार्यकारीअधिकारी यांना द्यावेपंचनामे होऊन मदत मिळते किंवा नाही मिळत तोपर्यत सरकारी थकबाकी बैंक कर्ज वसुलीस,पाणीपट्टी,ग्रापंचयत थकबाकी,शेतीपापंचे वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावीशासनाने एकरी५०हजार रुपये मदत घ्यावीपीकविमा १००%मंजूर करावा

यावेळी प्रवीण देवकर ,विजय सलालकर ,दत्ता कसबे,गणेश धुमाळ,किरण उघडे,बहिरनाथ मामा गोरे,भाऊराव सोळुंके,निलेश बनकर,दादा बडाख,भास्कर बारसे ,राजू भिंगारे,भाऊराव वाळुंज,गणेश गायकवाड,अमोल पवारअक्षय पटारे,राजू गुंजाळ,मनोज होंडमाजी सभापती दत्तात्रय हजारे पाटील ,सुधीर कोकाटे,दत्ता वामन,नितीन जंबे ,गणेश जंबे,अभिजित गुंड,आदीकार्यकर्तेउपस्थितहोते

अन्यथा मंत्र्यांच्या घरावर खर्डा भाकरी मोर्चा

. निवेदनात दिलेल्य मागण्या दिवाळीपूर्वी मान्य करून नुकसान भरपाई दिवाळीच्या दिवशी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्या च्या घरी खर्डा भाकरी आंदोलन करण्याचा इशारा जिल्हादयक्ष नितीन पाटील पटारे यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment

Comments system