🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

नगर पालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक वाचनालय येथे देशाचे पहिले गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती


श्रीरामपूर(वातार्हर)- लोहपुरुष, देशाचे माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे कणखर, कडक, शिस्तप्रिय व स्पष्ट वक्ता होते. 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रणाची आहुती देणाऱ्या आयर्न लेडी  होत्या या दोन्ही देशभक्त नेत्यांना मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करते असे  नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक म्हणाले.
       नगर पालिकेच्या वतीने लोकमान्य टिळक वाचनालय येथे देशाचे पहिले गृहमंत्री स्व. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व भारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक  यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.यावेळी नगरसेवक ताराचंद रणदिवे ,रवी पाटील, मुख्ताहर शाह, प्रकाश ढोकने, कलीम कुरेशी, राजेंद्र पानसरे, गोपाल वायनदेशकर ,मुथा ग्रंथपाल स्वाती पुरे आदी उपस्थित होते. 
        यावेळी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक म्हणाले की, ''स्व. इंदिराजी गांधी या देशावर निस्सिम प्रेम करणाऱ्या, जाती धर्माच्या पलिकडे विचार करणाऱ्या, देशामध्ये सामाजिक ऐक्य टिकवण्यासाठी प्रणाची आहुती देणाऱ्या आयर्न लेडी होत्या. पोखरण येथे अणुस्फोट करून जगातील मोठ्या देशांबरोबर भारताचे नाव जोडण्याची किमया स्व. इंदिराजी गांधी यांनी साधली. त्यांनी केलेले कार्य देश कधीही विसरू शकणार नाही. 
       सरदार पटेल यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे फार मोठं आहे. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या कार्यामुळे भारतीय जनतेच्या मनात आपलं एक वेगळं स्थान बनवलं आहे. भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांची पहिली प्राथमिकता सर्व संस्थाने खालसा करुन ती भारतात विलीन करणे हे होते. यावेळी कोणताही रक्तपाताशिवाय त्यांनी देशातील अनेक संस्थानं खालसा केली.

No comments:

Post a Comment

Comments system