🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

घर तेथे रस्ता या संकल्पनेनुसार शहराचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत ,नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक


श्रीरामपूर(वातार्हर)- घर तेथे रस्ता या संकल्पनेनुसार शहराचा विकास करण्यासाठी आपण यापुढेही कटिबद्ध आहोत अशी निःसंदिग्ध ग्वाही लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी दिली. 
शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कै.एकनाथ दादा गिरमे चौक तसेच भारत गॅस गोडाऊन पासून पश्चिमेकडे तर नेवासा नाक्यापर्यंत च्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या अंदाजे १ कोटी रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ आज आदिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी
नगरसेवक शामलिंग शिंदे, मुक्तार शहा,राजेंद्र पवार,रवी पाटील, प्रकाश ढोकणे, दिपक चव्हाण, संतोष कांबळे,वैशालीताई चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब सौदागर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, महिला शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, राजेंद्र पानसरे,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील साठे,प्रदीप गांधी, दीपक कुऱ्हाडे,,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा कार्याध्यक्ष जयाताई जगताप,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष अलत्मश पटेल, कामगार नेते दीपक चव्हाण, रईसभाई जहागीरदार, अकिलभाई शेख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस सोहेल दारुवाला,जिल्हा सरचिटणीस ऋषी डावखर, युवक शहराध्यक्ष सोहेल शेख, सोमनाथ गांगड, शहर उपाध्यक्ष सैफ शेख,राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष तौफिक शेख, अर्जुन आदिक, डॉ. बापूसाहेब आदिक, योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे, भैय्या भिसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष हर्षल दांगट, शहराध्यक्ष गोपाल वायदेशकर,संदीप चोरगे,प्रमोद शिंदे,साहिल सय्यद, इसाक शेख, युसुफ लाखानी आदि मान्यवर उपस्थित होते.
आदिक म्हणाल्या, कोणतेही राजकारण न करता शहर विकासाला आपण आजपर्यंत प्राधान्य दिले आहे.राज्य आर्थिक संकटात असतांना देखील  श्रीरामपूरच्या विकासासाठी आणि  वेगवेगळ्या कामांसाठी वापर आजही भरीव निधी आणला. 
आपण कोणत्याही कामाचा विसर पडू दिला नसून सर्वांना बरोबर घेऊन शह राचा विकास केला. अनेक संकटातून श्रीरामपूरच्या अस्तित्वासाठी आपण वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून हा निधी उपलब्ध करून घेतला आहे.
घर तेथे रस्ता या संकल्पनेतून प्रत्येक घरा साठी रस्ता बनविण्यात येईल. शहराचा अजूनही इतर  समस्या शिल्लकआहे त्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करीत राहू. यासाठी आपण कटिबद्ध आहोत, निधी कुठून आणि कसा आणायचा हे आपल्याला ज्ञात असून यापुढे श्रीरामपूर शहराची ओळख नव्याने होईल अशी कामेही पूर्ण करण्यात येतील असे नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या. 

नगरसेवक राजेंद्र पवार म्हणाले, नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर विकासाची घोडदौड सुरु आहे. मागील सत्ताधाऱ्यांनी विकास कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला, रस्त्यांची फक्त उदघाटने करायची रस्ता करायचा नाही अशी पद्धत होती, भूमीगत गटारयोजनेच्या नावाखाली संपूर्ण शहरातील रस्ते खोदून ठेवले होते नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी ही सर्व रस्ते करून घर तेथे रस्ता ही संकल्पना शहरात राबवली त्यामुळे श्रीरामपुरात जवळपास 99 टक्के रस्ते झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Comments system