जगण्याची उर्जा देणारे शब्द
संकटे येतात आणि जातात.समज-गैरसमज होत राहतात. माणसे भेटतात पुन्हा दुरावतात. संकटांत खंबीर असणे महत्त्वाचे. अचानक येणाऱ्या संकटाने, दुःखाने प्रत्येक माणूसच सुरुवातीला थोडासा चळतो, ढळतो. हे अगदी सहाजिकच आहे. निसर्गनियम आहे. अशा परिस्थितीत खऱ्याअर्थाने त्याला मानसिक आधाराची गरज असते. भावनिक खंबीरतेची आवश्यकता असते. यासाठी माणूस आपुलकीच्या चार शब्दांची वाट पाहत असतो. खंबीर बनवणाऱ्या माणसाचा शोध घेत असतो. मोकळे होण्यासाठी मनमोकळे बोलण्याची गरज असते. त्यासाठी कुणाच्यातरी हृदयात स्वतःची जागा हवी असते.
घाबरू नको संकटाना
म्हणुन कायम धीर देणारं
कोणीतरी असावं लागत
खांद्यावर हात ठेवून लढ म्हणणारं
मानसिक, भावनिक बळ प्रेमाच्या चार शब्दांनी मिळते. आपुलकीचे चार शब्द खूप मोठी प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. संकटाला सामना करण्यासाठी 'उभं’ करतात. अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य देतात. दुःख पचवण्याची शक्ती देतात. आपले आधारस्तंभ कोण असतील हे आपले अंतर्मन ठरवत असते. आपले आदर्श आणि जवळचे हेच आधारस्तंभ असतात. ही कविता सगळ्यांनाच आठवत असेल
खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
पैसे नको सर मला
जरा एकटेपणा वाटला
मोडून पडला संसार सारा
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवूनी
फक्त लढ म्हणा...
आपल्या आदर्श असणाऱ्या, भावनिक आधार देणाऱ्या गुरुजीने पाठीवर हात ठेवून लढ म्हटल्यावर कोणत्याही तुफानाला सामोरे जाण्याची ताकद आमच्यामध्ये येते. ती याच आपुलकीच्या शब्दाने. कौतुक करणाऱ्या, धैर्य देणाऱ्या दोन वाक्यांनी माणूस उभा राहतो. माणसे आयुष्यभर आधार शोधत राहतात. खरोखर यशस्वी जीवन जगण्यासाठी मानसिक ताकद देणारे चार शब्द हवेच असतात.
आजच्या कोरोना आणीबाणी काळात हेच आपुलकीचे चार शब्द फार महत्त्वाचे आहेत. संकट आपल्यापर्यंत येईस्तोवर आपण खंबीर असतो. एकदा का संकट आले; की एका क्षणात कोलमडून पडतो. हे आज पाहायला मिळते. चांगली चांगली खंबीर माणसे डगमगत आहेत. धडपडत आहेत. कोसळत आहेत. वेळ आल्यावर प्रत्येकालाच भीती वाटते. माणसे जेवढी कोरोनाने खचत नाहीत. त्यापेक्षा जास्त त्याच्या भीतीने गर्भगळीत होत आहेत. अनेकांना या ताणतणावांचे समायोजन करता येत नाही. अनेक जण याचे बळी होत आहेत. अक्षरश: भीतीने थरकाप होऊन बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आल्याचे ऐकायला मिळत आहे. इथे गरज आहे भावनिक, मानसिक भक्कमपणाची. संकटाला तोंड देणाऱ्या खंबीर मनाची, भरभक्कम हृदयाची…!
आज कोणत्याच कारणामुळे कुणाचेही उणेदुणे काढू नका. कुणा सोबत वैर भावना ठेवू नका. कुणाचा हेवा करु नका. कुणाचा द्वेष करू नका. असूया बाळगू नका. याउलट जेवढा लावता येईल तेवढा जीव लावा. एकमेकांचा जेवढा आधार बनता येईल तेवढा बना. एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने वागा. गर्व, अहंकार काढून टाका. शेवटी जान है तो, जहान है.... सांगता येत नाही कोणती वेळ कशी येईल...? कोणावर येईल...? कधी येईल...? आत्ताच सावध व्हा.. आता नाही तर, कधीच नाही.
हीच वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याची. परस्परांचा आधार होण्याचे. सुरक्षित सामाजिक आंतर ठेवायचे असले; तरी मानसिक दुरावा मात्र कमी करायचा आहे. काही समज, गैरसमज दूर करायचे आहेत. मनातून स्वच्छ, नितळ, निर्मळ व्हायचे आहे. नाविण्यासाठी, चां
चांगले बोलण्
स्तुती, कौतुक,
खरे पाहता कौतुक करण्यासाठी, प्रशंसा करण्यासाठी, दुसऱ्याला चांगले म्हणण्यासाठी माणसाचे मन खूप मोठे असावा लागते. अंतःकरणात उदारता असावी लागते. दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता असावी लागते. आपल्या स्वतःच्या भावना आणि संवेदना जाग्या असाव्या लागतात. त्यासोबतच आपल्यातला ‘मी’पणा, अहंकार नष्ट नाही तर नाही ; पण किमान कमी व्हावा लागतो. तरच निखळ कौतुक शक्य असते. दुसऱ्याला वाईट बोलणे, निंदानालस्ती करणे, कमी लेखणे सहज शक्य असते. चुका काढणे; हा तर माणसाचा स्थायीभाव असतो. खरेतर कौतुक करणे आणि चुका सुधारणे हा स्वभाव बनायला पाहिजे.
चांगल्
याउलट कारण असताना, चांगले घडलेले असताना, चांगले असताना चांगले न म्हणणे यामागेही धूर्तपणा दिसतो. द्वेष जाणवतो. आपल्यातील अहंकार डोकावतो. आपल्यापेक्षा जग सुंदर आहे; ही भावनाच नकोशी वाटते. आपल्यापेक्षा इतर लोक उत्कृष्ट काम करत आहेत. हे खरेखुरे वास्तव स्विकारायला आपण तयार नसतो. आपण आपल्या ‘स्व’विश्वातून बाहेर यायला तयार नसतो. स्वाभिमानाच्या पलीकडे गेलेला दुराभिमान झटकायला तयार नसतो. आपल्यापेक्षा दुसरे कोणी अधिक चांगले करूच शकत नाही हा विनाकारणचा अहंकार बळावत जातो. याचमुळे दुसऱ्यांची योग्य कारणामुळे ही स्तुती करणे, प्रशंसा करणे, प्रोत्साहन देणे सहज शक्य होत नाही. यासाठी मनाची उदारता आणि विचाराची परिपूर्णता यावी लागते. अंतःकरणाची थोरतेकडे वाटचाल व्हावी लागते.
दुसर्याच्
चांगल्याला चांगले म्हणायची सवय लागली. उत्तम कार्याची प्रशंसा होऊ लागली. मग सगळे जग आपल्याला आपले वाटते. कुणीही, काहीही चांगले केले तरी ते आपल्याला भावते. तोंड भरुन कौतुक करावे वाटते. उदात्ततेन मन भारावून जाते. उत्कृष्टतेचे कौतुक केल्याशिवाय मनाला स्वस्थता मिळत नाही. स्वतःबद्दलचा दुराभिमान, विनाकारण जोपासलेला अहंकार आपोआप विरघळू लागतो. ‘मी’पणा कुठल्या कुठे निघुन जातो. खऱ्या अर्थाने सुंदर असलेले जग अधिक सुंदर दिसायला लागते.
दुसऱ्याचे कौतु
खरेतर आजचा काळ असा आहे.... विचार कसे आहेत...? यापेक्षा विचार कोणाचे आहेत...? याला महत्त्व आहे. काम किती चांगला आहे..? किती तन्मयतेने केला आहे ? या पेक्षा ते कोणी केला आहे..? याला जास्त महत्त्व दिल्या जात आहे. गवगवा करणारे, आपली चांगली जाहिरात करू शकणारे, उत्तम ओळख-पाळख असणारे लोकच आज पुढे जाऊ शकत आहेत. गुणवत्ता हा निकषच उरलेला नाही. तुम्ही किती छान मांडता... तुमचे विचार किती उत्कृष्ट आहेत. यापेक्षा तुमच्या मागे लोकवलय किती आहे...? हेच पाहिल्या जाते... हीच प्रचंड मोठी शोकांतिका आहे. तुमचे विचार, तुमची शब्दरचना, तुमची मांडणी पाहण्यापेक्षा तुम्ही कोण आहात..? हेच पहिल्या जाते.
आपल्या जवळची, आपल्या ओळखीची माणसे आपली जेवढी स्तुती करत नाहीत, आपल्याबद्दल चांगले बोलत नाहीत. त्यापेक्षा जास्त अपरिचित अनोळखी माणसे आपले कौतुक करतात. आपल्याला चांगले म्हणतात. त्यावेळी माणसाचे मन भरून येते. खरेच काहीतरी चांगले केल्याचे समाधान मिळते. कौतुकाचे दोन शब्द माणसाच आयुष्य बदलून टाकतात. प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात. चांगल्या मार्गावर चालण्यासाठी बळ देतात. मनातली आणखी चांगले करण्याची इच्छा वाढवतात. लढायला शिकवतात. म्हणूनच आपुलकीने ‘फक्त लढ म्हणणारे’ गुरुजी दहा हत्तीचे बळ देतात...
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
ग्रीन पार्क, जिंतूर. जिल्हा परभणी.
No comments:
Post a Comment