Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडावे- पटारेअखिल भारतीय छावा संघटनेचा बंदला पाठींबा


एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडावे- पटारे

अखिल भारतीय छावा संघटनेचा बंदला पाठींबा

श्रीरामपूर- आघाडी राज्य सरकार जाड कातडीचे असून त्यांना जाग आण्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे, असे आवाहन छावा संघटनेचे जिल्हायधक्ष नितीन पटारे यांनी केले असून या आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

एस टी कर्मचाऱ्यांच्या संपास अखिलभारतीय छावा संघटनेचा जाहीर पाठिंबा आज श्रीरामपूरआगारात सुरू असलेल्या आंदोलनात अखिलभारतीय छावा मराठा युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नीतीन पाटील पटारे यांच्या सोबत कामगार आघाडीचे शैलेश वाघ ,वि आ चे लक्ष्मण कसबे,शहर अध्यक्ष शरद बोंबले,कार्यध्यक्ष गोरख शेजुळ,बे शहर अध्यक्ष दौलत गायकवाडजि संपर्क प्रमुख सचिन गवळी,ता उपाध्यक्ष गणेश धुमाळ,अक्षय पटारे आदीनी सहभाग घेऊन पाठिंबा दिला

यावेळी पटारे म्हणाले की तिघाडी सरकारने एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत घेऊन त्याच्या सर्व मागण्या मान्य करून संपाचा तिढा सोडवावा कारण अतिशय हालाकीचे जीवनजगत आज हे कर्मचारी कामकरत आहेत सकाळी कामावर येताना सोबत आणलेला डबा रात्री मुककमच्या ठिकाण खावा लागतो तेथे मुक्कामच्या ठिकाणी टॉयलेट ची सोय नसते खेड्यात अंघोळी साठी लोजिंग नसते ,तसेच 8तास दिवटी म्हणायला झालीय गाडी लेट होते रस्ते खराब 12 ते 13 तास गाडी चालावी लागते त्यामुळे शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडते त्यातून 40 ते42 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याआहेत अशी परिस्थिती राहिली तर कोणी एस टी कर्मचाऱ्यांना लग्नासाठी मुलगी देणार नाही ,किंवा त्यांच्या मुलांची सोयरीक बघणार नाही शेतकऱ्यां सारखी बिकट अवस्था या लोकांची होण्या आधीसरकारने यांच्या मागण्या सोडवाव्यात अथवा अस शांततेत संप करून नाही तर तीव्र बंड पुकारून आक्रमक आंदोलन सुरू करावे.

अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या सोबत आहे सर्वात प्रथम छावा चे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी लातूर येथे संपात सहभागी होऊन पाठींबा दिला आहे तुम्ही आंदोलन तीव्र करा छावा भावा प्रमाणे आपल्या सोबत राहील यावेळी अमोल पटारे ,कहाणे व इतर कर्मचऱ्यांनीभाषणे केली संघटनेचे आभार मानले व पाठींब्याचे पत्र स्वीकारले.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात