🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

श्रमीक शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्याशहिद शेतकऱ्यांच्या अस्थी कलश यात्रेस तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद


श्रमीक शेतकरी संघटनेच्यावतीने काढण्यात आलेल्या

शहिद शेतकऱ्यांच्या अस्थी कलश यात्रेस तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद

 

श्रीरामपूर :

श्रमिक शेतकरी संघटनेच्यावतीने लखिमपूर खेरी हत्याकांडातील शेतकऱ्यांच्या काढण्यात आलेल्या अस्थी कलश यात्रेस श्रीरामपुरात प्रचंड प्रतिसाद लाभला. यावेळी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शहिद झालेल्या ६५० हून अधिक शेतकऱ्यांनाही आदरांजली वाहण्यात आली. भाजपा वगळता सर्वच पक्ष, सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी शहर व तालुक्यात उत्स्फूर्तपणे अस्थी कलशास अभिवादन केले.



 केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधातगेल्या ११ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत. या आंदोलनाची दखल घेण्या ऐवजीउत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या,चार शेतकऱ्यांना आणि एका पत्रकारासभाजपचे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्र टेनी यांच्या गुंडांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडल्याने शेतकरी गंभीर जखमी झाले होते. शेतकऱ्यांवरील या भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या शेतकरी बांधवांचीअस्थि कलश यात्रेला पुण्यातून  दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरुवात झाली.

श्रमिक शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने एक कलश श्रीरामपुरात आणण्यात आला. यायात्रेचे श्रीरामपुरात सययद बाबा दर्ग्याजवळ संविधान बचाव समितीपालिकेच्या समोर नगराध्यक्षा अनुराधा आदिक व त्यांचे  सहकारी,गिरमे चौकात कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते नागेश सावंत,  आमदार कार्यालयाजवळ समिन बागवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवादन केले. त्यांनतर बेलापूर,पढेगावमालूजा, भेर्डापूर, कारेगाव, टाकळीभान, भोकर, वडाळा महादेव, निपाणी वडगाव याठिकाणी अभिवादन कार्यक्रम होऊन सभा झाल्या.



संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली तीन कृषी कायदे रद्द करा. किफायतशीर आधार भावाची हमी देणारा केंद्रीय कायदा करा, सामान्य ग्राहकांना उद्धवस्त करणारे वीज विधेयक मागे घ्या, या मागण्या  तातडीने मान्य करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास तिव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  

यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्रमीक शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष कॉ. राजेंद्र बावके, जिल्हाध्यक्ष कॉ. जीवन सुरूडे, तालुकाध्यक्षप्रकाश भांडबाळासाहेब सुरुडेमदिना शेख,शरद संसारेश्रीकृष्ण बडाख ,उत्तम माळी,अरुण बर्डे, ज्ञानेश्वर जाधव, मिठ्ठूभाई शेख,अरुण बर्डे, राजेंद्र मुसमाडे, आश्रु बर्डे, नानाभाऊ तारडे, रामा काकडे आदींनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Comments system