दिवाळी एक जागतिक सण
‘दिवाळी सण मोठा…. नाही आनंदाला तोटा….’ हिंदू धर्मात दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
दिवाळी आहे आपला
सर्वात मोठा सण
म्हणून धूमधडाक्यात
करतो साजरा प्रत्येकजण
हा सण संपूर्ण भारतामध्ये सर्वत्र साजरा केला जातो. हजारो वर्षापासून हा सण साजरा करण्याची पद्धत रूढ आहे. या सणानिमित्त संपूर्ण देशभर सार्वजनिक सुट्टी असते. पावसाळा नुकताच संपलेला असतो. खरीप हंगाम संपलेला असतो. नुकतेच पीक आलेले असते. शेतकऱ्याचे घर याच काळात धनधान्याने समृद्ध झालेले असते. तरीही अनेक नैसर्गिक व इतरही अनेक समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागतेच. त्यातल्या त्यात हा काळ शेतकऱ्याच्या भरभराटीचा काळ असतो. म्हणून ‘कृषीउत्सव’ स्वरूपात हा सण साजरा करण्याची पद्धत आहे. श्रावण महिन्यापासून सुरु झालेली सणांची मालिका दिवाळीला फार मोठ्या प्रमाणात बहरते. अश्विन वद्य द्वादशी पासून ते कार्तिक शुद्ध द्वितीया पर्यंत हा ‘दीपोत्सव’ सुरू राहतो. अशाप्रकारे साधारणत: सहा-सात दिवस हा सण अत्यंत आनंदात, उत्साहात व जल्लोषात प्रत्येक घराघरात, गावागावात, शहराशहरात,
दिवाळी या सणाची सुरुवात शेतकऱ्याला शेत पिकवण्यासाठी मोलाची मदत करणाऱ्या बैलाचे व त्याला जन्म देणाऱ्या गाईचे ऋण व्यक्त करण्याच्या दिवसापासून म्हणजे गोवत्स द्वादशी या दिवसापासून होते. रमा एकादशी नंतर येणाऱ्या अश्विन वद्य द्वादशीला गोवत्स द्वादशी, वसुबारस आणि गुरुद्वादशी असे म्हणतात. या दिवशी सवत्स धेनूची विधिवत पूजा करण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात गाईला अत्यंत पवित्र मानले आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास आहे असे समजल्या जाते. अशा पवित्र गोमातेची कृतज्ञ अंत:करणाने तिच्या वासरासह, पाडसासह विधीवत पूजा करून तिला नैवेद्य दिला जातो. श्रद्धेने तिचे दर्शन घेतले जाते.
यानंतर आश्विन वद्य त्रयोदशीला ‘धनत्रयोदशी’ साजरी केली जाते. यालाच ‘धनतेरस’ असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या दिवशी धनधान्याची, धनसंपत्तीची पूजा केली जाते. सर्वत्र दिव्यांचा झगमगाट केला जातो. धनत्रयोदशी ची एक अध्यात्मिक कथा आहे या कथेनुसार या दिवशी अपमृत्यु, अकाली मृत्यू टाळण्यासाठी मृत्यू देवता यमाला दीपदान केले जाते. यमदीपदान करून प्रत्येकजण उदंड आयुष्याची प्रार्थना मृत्यू देवता यमाकडे करतात. याच दिवशी समुद्रमंथनातून आरोग्य देवता श्री धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रगटले होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी ‘धन्वंतरी जयंती’ सुद्धा साजरी केली जाते. यानिमित्ताने सर्व डॉक्टर, वैद्य, आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी ‘धन्वंतरी जयंती’ साजरी करतात. श्री धन्वंतरी देवतेची पूजा आराधना करतात. श्री ‘धन्वंतरी जयंती’ औचित्य साधून संपूर्ण देशभरात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी, सर्व प्रकारची औषधे यांचा आदर-सन्मान केला जातो. आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये श्री धन्वंतरी देवतेला प्रचंड महत्त्व आहे. दिवसेंदिवस आयुर्वेदाचे महत्त्व संपूर्ण जगाला ज्ञात होत आहे. म्हणूनच संपूर्ण जगात श्री ‘धन्वंतरी जयंती’ व ‘आयुर्वेद दिन’ धनत्रयोदशीच्या दिवशी साजरा करण्यात येत आहे. अशाप्रकारे धनत्रयोदशी चे महत्व अनन्यसाधारण आहे.
यानंतर आश्विन वद्य चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ म्
अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी स्थिर मुहूर्तावर श्री लक्ष्मी देवतेची पूजा आराधना केली जाते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी व आर्थिक भरभराट राहावी यासाठी श्री लक्ष्मी देवतेची उपासना केली जाते. श्रीसुक्ता चे पठण करण्यात येते. यथोचित व षोडशोपचार श्री लक्ष्मीदेवीची पूजाविधी घराघरात होतो. व्यापारी मंडळी यादिवशी आपल्या दुकानात विधिवत श्री लक्ष्मी देवीची पूजा उपासना करतात. वही पूजन केले जाते. याच लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर घराघरात लक्ष्मी रूपात वावरणाऱ्या लेकी-सुना, माता-भगिनी, यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जातो. त्यांचा आदर सत्कार करण्यात येतो.
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘बलिप्रतिपदा’ यालाच ‘दि
इडा पिडा टळू दे
बळी राज्य येऊ दे...
माझ्या शेतकऱ्यावरची संकटे
देवा आता तरी संपू दे....
त्याच्याही जीवनात सुखाचे
चार दिवस येऊ दे
याच दिवशी संपूर्ण गोकुळ वासियांचे इंद्र प्रकोपाने होणाऱ्या अतिवृष्टी पासून संरक्षण करण्यासाठी भगवान जगद्गुरु श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलण्याची अख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे बलिप्रतिपदेच्या दिवशी भक्तीभावाने गोवर्धन पर्वत उचलून सर्वसामान्याचे रक्षण करणाऱ्या प्रभू श्रीकृष्णांची पूजा केली जाते. व्यापारी मंडळी या दिवसापासून नवीन वर्षाला सुरुवात झाली असे म्हणतात. पाडव्याच्या मुहूर्तावर सोने-चांदी, दाग-दागिने, वाहने,
कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी दिवाळी सणाचा शेवटचा दिवस ‘भाऊबीज’ म्हणून साजरा केला जातो. यालाच यमद्वितीया असेसुद्धा म्हणतात. या बाबतही एक अख्यायिका सांगितली जाते. याच दिवशी यम आपल्या बहिणीला म्हणजे यमुना अर्थात यमीला तिच्या आग्रहास्तव भेटायला जातो. यमुना यमाचे खूप आदरातिथ्य करते. त्याच्यासाठी घर सजवते. रांगोळ्या काढते. घरामध्ये दिव्यांची आरास करते. सगळीकडे झगमगाट करते. यमासाठी गोडाधोडाचे पंचपक्वान्न करते. या आदरातिथ्याने यम यमुनेवर प्रसन्न होतो. तिला काय पाहिजे...? ते मागायला सांगतो अर्थात वर देतो. त्यावेळी त्याची बहीण त्या मृत्
अशाप्रकारे अश्विन वद्य द्वादशी म्हणजे ‘गोवत्स द्वादशी’ पासून सुरु होणारा दिवाळी हा सण कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजे ‘यमद्वितीये’ पर्यंत चालतो. दिवाळी सणानिमित्त घरे सजवली जातात. घराची रंगरंगोटी सुशोभिकरण केले जाते. स्वच्छता साफसफाई केली जाते. घराला झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते. घरासमोर सुंदर रांगोळी काढली जाते. वेगवेगळ्या पदार्थांचा फराळ केला जातो. घरावर आकाश कंदील लावला जातो. दीपावली सणांमध्ये दिव्यांना फार महत्त्वाचे स्थान आहे. या संपूर्ण सणात दिव्यांची आरास केली जाते. म्हणूनच खऱ्या अर्थाने दिवाळी हा ‘दीपोत्सव’ आहे. प्रत्येकाच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार ज्ञानाच्या दिव्याने नष्ट व्हावा.... हीच प्रार्थना दिवाळीनिमित्त केली जाते. दिवा हे ज्ञानाचे, प्रकाशाचे, तेजाचे, भ
दिवाळी हा सण आता फक्त भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. तर दीपावली हा सण आज संपूर्ण जगामध्ये उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा होत आहे. दिवाळी या सणाला जागतिक स्वरूप येत आहे. जगभरातील भारतीय आपापल्या शहरात दिवाळी साजरी करतात. अमेरिका येथील न्यू जर्सी या भागात भारतासारखी दुकाने सजवलेली आढळतात. लंडन शहरात ही दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी हा प्रामुख्याने हिंदू तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जातो. भारत, गयाना, त्रिनदा, टोबॅगो,
दीपावली.....
दिवाळी हाच आपला
आहे सण फार मोठा
गोवत्स द्वादशी साठी
स्वच्छ करू गाई गोठा
अश्विन-कार्तिक मासी
दिवाळी संधी काळाची
वसुबारसे पासून
सुरुवात या सणाची
सवत्स धेनु पुजावी
गोवत्स द्वादशी दिनी
आहे पवित्र गोमाता
हेच ठेवा तुम्ही ध्यानी
धनत्रयोदशी दीप
दान करा हो यमाला
अकाली मृत्यू टळेल
दीर्घायुष्य हो तुम्हाला
याच दिनी धन्वंतरी
प्रगटे समुद्रातून
जीवरक्षी डॉक्टरांचे
आभार हे मनातून
नरकासुराचा वध
नरकचतुर्दशीला
प्रभू श्रीकृष्ण आमचे
धाव घेती रक्षणाला
सर्व समस्या संपून
राज्य येऊ दे बळीचे
कृपा करी भगवंता
भाग्य उजळो शेतीचे
पाडवा आहे प्रतीक
बापलेकीच्या प्रेमाचे
रेशिमबंध गुंतले
पती-पत्नीच्या नात्याचे
बहिण-भाऊ आनंदे
भेटती भाऊबीजेला
करी औक्षन प्रेमाने
दीर्घायुष्य दे भावाला
सजले घर-अंगण
दीपावलीच्या सणाला
दिव्यांची आरास आहे
आकाश कंदील घराला
लेखक / कवी
©® मयूर मधुकरराव जोशी
No comments:
Post a Comment