🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

कवी साळवे यांच्या पुस्तकाला मराठी साहित्य व वांडमय मंडळाचा पुरस्कार



कवी साळवे यांच्या पुस्तकाला मराठी साहित्य व वांडमय मंडळाचा पुरस्कार

श्रीरामपूर: तालुक्यातील निपानी वडगाव येथील ग्रामिण कवी आनंदा साळवे यांच्या ‘वेशीबाहेरचे जगणं’ पुस्तकाला मुंबई येथील मराठी साहित्य व वांडमय मंडळ यांच्यावतीने दिला जाणारा साहित्यरत्न हा पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती आयोजक वर्षा थोरात यांनी दिली आहे.

            साताऱ्यातील मान तालुक्यातील म्हसवड येथे दि. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य संम्मेलनात या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

            कवी आनंदा साळवे यांच्या ‘वेशीबाहेरचे जगणं’ या पुस्तकात भटक्या विमुक्त जमाती, दलित समाज अठरा पगड जमातीवंर कविता लिहिल्या आहेत. यात शोषित, पिडीत समाजाच्या व्यथा कवी साळवे यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. याच पुस्तकाला २०१२ साली मुंबई येथील मैत्री संस्थेच्यावतीने कवीमित्र हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

भावस्पर्षी शब्दरचना, वास्तवादी वर्णन आणि डोळ्यात पाणी आणणारी कविता हे त्यांच्या लिखानाचे वैशिष्ठये आहेत. त्यांचे आजवर सात कविता संग्रह प्रसिद्ध झाले असून आतापर्यंत राज्यस्तरावरील ५० हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. ग्रामिण कवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी साळवे हे हमाली काम करून आपला कवितेचा व्यासंग वाढवत असल्याने साहित्य क्षेत्रातील सर्वच दिग्गजांना त्यांचे नेहमीच आप्रुप वाटत आले आहे. या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरातून कवी साळवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

 

No comments:

Post a Comment

Comments system