🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर छावाचे हल्लाबोल आंदोलन तुर्तास पुढे ढकलले


महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर छावाचे हल्लाबोल आंदोलन तुर्तास पुढे ढकलले

जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांची माहिती

श्रीरामपूर:- महावितरणमार्फत नगरजिल्ह्यात सर्वच तालुक्यात विजबिल वसुलीसाठी विजतोडणी अभियान राबविण्यात येतआहे. कोणतीही पूर्व सूचना नोटीस न देता शेतीपपंची बेकायदेशी पणे वीज तोडून पठाणी वीजबिल वसुली केली जात आसहे. ही कारवाईथांबविण्यासाठी छावा संघटनेने हल्लाबोल आंदोलनाचा इशारा देताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. त्यामुळे ३ डिसेंबर रोजी होणारे हल्लाबोल आंदोलन तुर्तास पुढे ढकलण्यात आले असल्याची माहिती छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी दिली आहे.

सध्या शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना महावितरणवीज खंडीत करीत आहेत. याबाबत तीव्र संताप व्यक्त करीत छावाचे पटारे यांनी कार्यकारी अभियंत्यांना हल्लाबोल आंदोलनाचा इशारा दिला होता. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले होते कीसप्टेंबर अक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले असून खरीप पीक वाया गेलेसरकारी भरपाई तुटपुंजी ती ही मिळाली नाही त्यात आपल्या कडून कोणतीही पूर्वसूचना न देता होणारी विजबिलाची बेकायदेशीर पठाणी वसुली साठी चालू असलेली वीज तोड (वीजपुरवठा खंडित करणे)थांबवावी

दि25 अक्टोबर2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या कार्यलयावर अखिलभारतीय छावा  संघटनेच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढून वीजबिल वसुलीस स्थगिती मिळावी अशी मागणी केली होती तसे पत्र आपल्याला जिल्हाधिकारी कार्यल्याकडून आले आहे तरी आता कांदा लागवडी आणि रब्बी हंगामात इतर पिकाच्या लागवडी चालू आहेत खरीप हातचा गेला रब्बी चे पीक आलेवर आम्ही बिल भरू शकतो तोपर्यंत आपली अडवणूक करून बेकायदा वीज तोडून चालू असलेली वसुली थांबवावी.

 या निवेदनांतर कार्यकारी अभियंता भांबळे यांच्या आदेशावरून तसेच श्रीरामपूर तालुका पोलिस निरीक्षक मधूकर साळवे यांच्या मध्यस्तीनंतर उपकार्यकारी अभियंता छाबडा यांच्या दालनात आज छावाचे पटारे व शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी पटारे यांनी शेतकऱ्यांच्या तीव्र भावना अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्या. त्या ऐकून घेतल्या नंतर छाबडा यांनी एका रोहित्रावरील ७० टक्के शेतकऱ्यांनी किमान चालू दोन बिले भरावीत, असे रोहित्र भविष्यात बंद पडल्यास रोहित्र भरून देणे, खराब केबल, फ्यूज बदलणे अशा सुविधा महावितरकडून देण्यात येतील. आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, आपण आंदोलन करू नये अशी लेखी विनंती केली.  त्यानंतर पटारे यांनी उद्या अर्थात ३ डिसेंबर रोजी होणारे हल्लाबोल आंदोलन तुर्तास पुढे ढकलले.

यावेळी निलेश बनकर पाटील(शेतकरी आघाडी प्रमुख)प्रवीण नाना देवकर (जिल्हा सरचिटणीस)शरद बोंबले (शहर अध्यक्ष)मनोज होंड(शहर उपाध्यक्ष)दादा बडाख (जिल्हा संघटक)विजय बडाख (तालुकाअध्यक्ष)प्रवीण लबडे (तालुका संघटक),अनिल जाधव,जयदीप काळेसंतोष जाधवहरिभाऊ जाधवसंजय जगताप,हरिभाऊ राऊतबाबासाहेब शेरकररामभाऊ सलालकरभाऊसाहेब कचरेरियाज पठाणभीमराज राऊतदिगंम्बर आरंगलेआदी उपसथित होते.

No comments:

Post a Comment

Comments system