Indian News E Gramसत्य • निष्पक्ष • विश्वासार्ह पत्रकारिता
|
LIVE
बातम्या लोड होत आहेत...
LIVE WEATHER
हवामान माहिती लोड होत आहे...

ताज्या बातम्या

शेतकरी मराठा बोर्डींग सुरू करण्याचा निर्धारश्रीरामपूर तालुका मराठा एकीकरण समितीची स्थापना


शेतकरी मराठा बोर्डींग सुरू करण्याचा निर्धार

श्रीरामपूर तालुका मराठा एकीकरण समितीची स्थापना

श्रीरामपूर:-श्रीरामपूर तालुक्यातील १९४५ सालीस्थापन झालेल्या शेतकरीमराठा बोर्डींगची अतिशय दुरवस्था झाली असून, याठिकाणी आता डुकरांचा वावर सुरू झाला आहे. ही बोर्डींग आता पूर्णपणे बंद अवस्थेत असून तालुक्यातील या मोठ्या संस्था पुनरूज्जीवीत करण्यासाठी तालुका मराठा एकीकरण समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत निर्धार केला आहे.

 तालुक्यातील मराठा संघटनांनी एकत्र येत श्रीरामपूर तालुका मराठा एकीकरण समिती नुकतीच स्थापणा केली. यावेळी बोर्डिंगचे मूळ संथापकांचे वंशज डावखरभांडमहाडिक यांच्यासह मराठा बांधव उपस्थीत होते.

यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नितीन पटारे यांनी माहिती अधिकारातून आजपर्यंतच्या बोर्डिंगच्या कागदपत्रांची माहिती दिली. आणि शेतकरी मराठा बोर्डिंग पुन्हा सुरू करण्यासाठी यापूर्वी छावा संघटनेच्या वतीने  आंदोलन करण्यात आल्याबद्दल सांगितले. तालुक्यातील मराठा बांधवांनी सर्व भेदाभेद विसरून मराठा एकीकरण या नावाने एकत्र येण्याचे आव्हान त्यांनी यावेळी केले.

यास सर्वांनी प्रतिसाद देत सर्व पक्ष, संघटना विरहित मराठा एकीकरण नावाने  समिती स्थापन केली. यात कोणी अध्यक्ष नाही सर्व समनव्यक म्हणून काम करतील असे सर्वानुमते ठरले.

सर्वांनी एकत्र येत शेतकरी मराठा बोर्डिंग सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार  माजी नगरसेवक अण्णासाहेब डावखर यांच्या समवेत नितीन पटारेदीपक डावखरबाबा भांड, विजय ढोकचौळेरोहन डावखरशैलेंद्र डावखरसंदीप डावखरमाऊली मोरगेदत्तात्रय दळेऋषिकेश मोरगेकृष्णा विधातेराजेंद्र मोरगेनितीन सोनवणे, डॉ. रवी महाडिकसंजय भुजाडी, डॉ. अरविंद बडाखसंजय जगताप, गजेंद्र डावखरसंतोष भागडेप्रशांत पटारेऍड संदीप चोरमलरोहित उंडेसचिन खर्डे यांनी केला.

WhatsApp वर 4 बातम्या शेअर करा

टिप्पण्या

विशेष जाहिरात