🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

अखिल भारतीय साहित्य संमेलनात परभणी जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग....




जिंतूर / परभणी वर्धा येथे 3,4 व 5 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील विविध साहित्य मंडपापैकी निमंत्रितांचे कवी संमेलन या मंडपात ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ विलास पाटील आणि मोहन कुलकर्णी यांनी आपल्या दमदार रचना सादर केल्या.

 प्रा. देविदास सोटे कविकट्टा या साहित्य मंडपात परभणी जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग दिसून आला. परभणी जिल्ह्यातील कवींनी विविध विषयावरील आपल्या बहारदार कविता सादर करून रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.

यामध्ये परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील कवी मयूर जोशी यांनी

रक्ताला कधीच नसतो धर्म
आणि नसते कोणतीच जात
तेच तर सांगत असते माणसांना
खरी एकात्मतेची बात...

रक्ताचे आणि रक्तदानाचे महत्त्व सांगणारी 'रक्तदान' ही आगळी-वेगळी कविता सादर करून प्रेक्षकांच्या उदंड टाळ्या मिळवल्या.  या कवितेसह परभणी जिल्ह्यातील कवींनी विविध दर्जेदार कविता सादर केल्या यामध्ये कवी आनंद कुलकर्णी यांनी 'अमृत', दिलीप शिरपूरकर यांनी 'कशी सुरात नटली कविता मग हसली बघता बघता', अर्चना शंभरकर यांनी 'कृष्णा', संतोष शेलूकर यांनी 'तुझ्या बांगड्यातून', सौ पांडे मॅडम यांनी 'रस्ता' तर इतर सहभागी कवींनी विविध विषयावर आपल्या कविता सादर केल्या. एकूणच 96 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातील हा परभणी जिल्ह्याचा उल्लेखनीय सहभाग जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

No comments:

Post a Comment

Comments system