करा सुधारणा 'स्व'ची.......
जीवन जगताना बारकाईने विचार केला तर आपण स्वतःपेक्षा नेहमी इतरांचे जास्त परीक्षण करतो. जीवनाच्या अनेक वळणावर वेगवेगळी माणसे भेटतात. त्यांचा सहवास लाभतो. संपर्कात आलेल्या अशा विविध माणसांचे भावविश्व आपण अनुभवलेले असते.आपण स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्यांच्या भावभावना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्याची होणारी घुसमट समजते. दुसऱ्याचे दुःख कळते. दुसऱ्याला आलेला रागही कळतो. एका कटाक्षात दुसर्याची नाराजी कळते. सहजच दुसऱ्याचे सुखही लक्षात येते. दुसऱ्याचा स्वार्थ समजतो. पण याच सगळ्या गोष्टी स्वतःच्याही असतात. त्या तेवढ्या प्रखरपणे स्वतःला कळत नाहीत का...? कदाचित कळत असूनही माणूस त्याकडे मुद्दामहुन दुर्लक्ष करतो. हेतू पुरस्कृत कानाडोळा करतो. माणसाने आत्मचिंतन करावे. असे माणसाला वाटते खरे; पण माणूस मनापासून आत्मचिंतन करत नाही.
बोलताना आपण अनेक वेळा सहज बोलून जातो. मी त्याला पुरता ओळखून आहे. मला त्याची संपूर्ण कुंडली माहित आहे. मला त्याच्याबद्दल खडानखडा माहिती आहे. मी त्याला अंतर्बाह्य ओळखतो. यासारखे अनेक विधाने आपण सदोदित करत असतो. आपल्याला माणसे चांगली पारखता येतात. असा अनेक जणांना खूप मोठा भ्रम असतो. याच गोष्टीची ते प्रौढी मिरवतात. प्रत्यक्षात तसे काही नसते. ज्याअर्थी माणूस स्वतःला समजून घेऊ शकत नाही. स्वतःचे गुणदोष पारखू शकत नाही. खऱ्या अर्थाने माणसाला स्वतःची ओळख होत नाही. तोच माणूस इतरांना परिपूर्ण रित्या समजू शकेल काय...? जो व्यक्ती मी दुसऱ्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. असे म्हणतो. अशा व्यक्तीला एक प्रश्न अवश्य विचारा. तुम्ही कसे आहात...? या एका प्रश्नांचे अगदी अचूक, वस्तुनिष्ठ असे उत्तर देता येईल का...?
खूप विचार करा. पूर्णपणे विचारात हरवून जा. बघा विचार करून... कसा आहे मी...? चांगला आहे ; की वाईट आहे. स्वाभिमानी आहे; की दुराभिमानी आहे. शांत आहे; की रागीट आहे. मनमोकळा आहे; की कुढ्या स्वभावाचा आहे. आनंदी आहे की; दुःखी आहे. खरा आहे ; कीखोटा आहे. वस्तुनिष्ठ आहे ; की व्यक्तिनिष्ठ आहे. गुणग्राहक आहे ; की गुणद्वेष्टा आहे. समजूतदार वृत्तीचा आहे ; कि आडमुठ्या वृत्तीचा. थोडक्यात कसा आहे मी...? खरोखरच मी स्वतःला ओळखू शकलोय का...? मी जर स्वतःलाच ओळखले नसेल; तर मी दुसऱ्याला ओळखू शकतो का..? मला इतर माणसे पारखता येतील का...?
स्वतःला ओळखणे एवढे सोपे नसते. 'स्व'ची ओळख करता-करता मनुष्यजीवन अक्षरशः मार्गी लागते. संपूर्ण आयुष्य संपता संपता माणसाला काही अंशी ‘स्व'ची जाणीव होते. मरणासन्न अवस्थेमध्ये आपण स्वतःला उलगडू लागतो. मरण दारात उभे असताना काही अंशी खरा वस्तुनिष्ठ ‘स्व’ आपल्याला समजायला लागतो. त्यावेळी कळते आयुष्यभर आपण जो ‘मीपणा’ बाळगला तो केवळ गर्व आणि अहंकार होता. खरा ‘स्व’ आपण ओळखलाच नाही. आयुष्यभर आपण जो ‘स्व’ प्रस्तुत केला. सादर केला. तो केवळ मुखवटा होता. खरा ‘स्व’ तर काही वेगळाच आहे. आजपर्यंत आपण आपल्या चेहऱ्यावर, स्वभावावर आणि शरीरावर सुद्धा अनेक मुखवटे दिखाव्यासाठी लावले. त्याच मुखवट्याकडे संपूर्ण जगाने पाहिले. संपूर्णतः खोटा असला तरी जगाने स्वीकारलेल्या मुखवट्यालाच आपण स्वतःचे नाव दिले. प्रत्यक्षातला खरा ‘स्व’ मात्र तसाच राहिला अंधारात. कायमचा एकटाच स्वतःच्या दुनियेत. ‘स्व’ कसाही असो तो लवकरात लवकर शोधायला लागा. मरण दारात उभे असल्यावर कळलेल्या 'स्व' ला काहीही अर्थ नसतो. त्यावेळी आपल्यातले गुण-अवगुण कळून काहीच साध्य होत नाही. खऱ्या अर्थाने स्वतःला समजून घेण्याची गरज आता आहे. आत्ता जर आपण स्वतःला समजून घेतले तर आपल्यातील वाईट गुण आपण संपवू शकतो. चांगले गुण असतील तर ते वाढवू शकतो. अजिबातच नसतील तर नव्याने चांगल्या गुणांचा शोध घेऊन त्याची आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये रुजवण करता येईल. आणि खऱ्या अर्थाने मनुष्यजीवन सार्थकी लावता येईल.अध्यात्म ही काही वेगळे सांगत नाही. खऱ्या अर्थाने ‘स्व’ ची ओळख म्हणजेच देवाची ओळख आहे. हेच खरे अध्यात्म आहे. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे आत्मचिंतन करून वस्तुनिष्ठपणे स्वतःला ओळखणे. खऱ्या अर्थाने स्व'ची जाणीव करून घेणे.
खूप गहन विचार करण्याच्या भानगडीत पडू नका. गोष्ट खूप साधी-साधी आणि सरळ-सरळ आहे. माणसाला स्वतःचे स्वतःला ओळखणे कठीण आहे. त्याअर्थी दुसऱ्या व्यक्तीला तो वस्तुनिष्ठ ओळखू शकत नाही. याच गोष्टीची दुसरी बाजू अशीही आहे. सर्वच माणसे, सर्वच वेळी, सर्वांशीच सारखीच वागत नसतात. स्थळ, काळ, वेळ आणि व्यक्ती परत्वे माणसाचे वागणे बदलत जाते. यालाच ‘जशास तसे’ वागणे असेही म्हणतात. खरे पाहता खूप उत्कृष्ट स्वभाव असणाऱ्या माणसाने सुद्धा सर्वांशीच चांगले वागावे असे काही नसते. चांगल्या माणसानेसुद्धा फक्त चांगल्या माणसासोबत चांगले वागावे. असे अपेक्षित असते. वाईट माणसासोबत सुद्धा आपण चांगल्या माणसाएवढेच चांगले वागू लागलो.... तर चांगल्या आणि वाईट माणसांमध्ये फरक कोणता राहील...? वाईट सोबत चांगले वागणे म्हणजे चांगल्या माणसावर केलेला अन्याय नाही का..? म्हणून नेहमी जाणत्या माणसाने कायमस्वरूपी जशास तसे वागावे.
जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण हे खूप उदात्त व्यक्तिमत्व आहे. खर्या अर्थाने ते करुणानिधी, दयाघन आहेत. म्हणजेच त्यांनी प्रत्येकावरच करुणा व दयेचा वर्षाव करावा का...? याचा अर्थ.... श्रीकृष्णाने सर्वांचे सर्व गुन्हे माफ करावेत....? तर असे अजिबात करू नये... अर्थात श्रीकृष्णाने असे केलेले नाही. भगवान श्रीकृष्ण कायम धर्माच्या, सत्याच्या बाजूने आणि अधर्माच्या, असत्याच्या विरोधात उभे राहिले. सज्जनांचे रक्षण; तर दुर्जनांचा संहार केला. सहृदयी, योग्य गरजवंतांना मदत केली. अहंकारी गर्विष्ठ माणसाचे गर्वहरण केले. नेहमी चांगल्याशी चांगले ; तर वाईट अशी वाईट वागले. वाईट माणसासोबत चांगले वागणे हा चांगुलपणा होत नाही. वाईटासोबत चांगले वागणे म्हणजे.... त्याच्या वाईट पणाला कळत-नकळत प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. त्यामुळे व्यक्ती जवळची असो की दूरची.... नेहमी सद्गुणांचा आदर आणि दुर्गुणांचा तिरस्कारच झाला पाहिजे. चांगल्या कामाचे कौतुक तर वाईट कामाचे खंडन झाले पाहिजे.
इतकेच नाही तर याच्याही पुढचा विचार करून असे म्हणता येईल. चांगली आणि वाईट यांचा फक्त दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करू नये. सगळ्यात अगोदर चांगल्या-वाईट या दोन्ही गोष्टीचा स्वतःच्या बाबतीमध्ये विचार झाला पाहिजे.आपल्यात काय चांगले आहे...? काय वाईट आहे...? कोणते गुण आहेत....? कोणते अवगुण आहेत....? कोणती बलस्थाने आहेत....? कोणत्या उणिवा आहेत....? काय बरोबर आहे....?काय चुकत आहे....? हे शोधले पाहिजे. सगळ्या गोष्टीचा स्वतःच्या बाबतीत बारकाईने विचार केला पाहिजे. कोणतीही संकल्पना प्रथम आपल्यासोबत पडताळून पाहिली पाहिजे. एक अतिशय साधे सोपे उदाहरण देतो. या जगात प्रत्येक माणूस स्वार्थी असतो. फरक एवढाच त्याचे प्रमाण कमी जास्त असेल. पण प्रत्येकात स्वार्थ मात्र नक्कीच असतो.
सबंध जगाच्या पाठीवर, पृथ्वीवरल्या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये अनेक जीव आहेत. या सर्व जीवांमध्ये मनुष्यप्राणी हा सर्वात बुद्धिमान आहे. निरागस मुले आणि निरागस प्राणी यांना गरजा असतात. परंतु मतलब नसतो. निरीक्षण करून पहा... प्राणी आपल्या गरजा भागवतात. पण वर्षानुवर्षासाठी कधीही साठा करताना दिसत नाहीत. आजचा दिवस भागवणे, आजची वेळ भागवणे हेच त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. निरागस मुले म्हणजे मतलबी होण्याएवढे बुद्धी न आलेली बालके सुद्धा आपल्याला खूप चांगली वागतांना दिसून येतात.परंतु बुद्धीने परिपूर्ण झालेला माणूस मात्र स्वार्थाने वागतांना दिसतो. या जगात कोण स्वार्थी नाही...? याचा विचार केला तर फार उदार अंतःकरणाची माणसे सोडली तर सर्वसामान्य सर्वच माणसे स्वार्थी असल्याचे दिसून येते.
असे असले तरी प्रत्यक्षात आपल्यामध्ये असणारा स्वार्थीपणा सहजासहजी आपल्याला जाणवत नाही. आपण अगदी सहजपणे दुसऱ्याला स्वार्थी म्हणून मोकळे होतो. खरे पाहता तो एकटाच स्वार्थी नसतो. त्याच्या एवढाच स्वार्थ प्रत्येकातच असतो. स्वार्थीपणा बाबतीतच नाही तर सर्वच गुण-दोष कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात असतात. आपण मात्र आयुष्यभर सातत्याने दुसऱ्यांना पारखत, निरखत राहतो. दुसऱ्याचे मूल्यमापन करतो. सातत्याने इतर माणसे कशी आहेत त्यांच्याबद्दल बोलत असतो. इतरांवर टीका टिपणी करतो. कुणीही मागणी केली नसताना सतत सल्ले देत असतो. पण माझ्या मते या कुठल्याच गोष्टीची गरज नाही. आपण पहिल्यांदा आपल्या स्वतःचे आत्मचिंतन केले पाहिजे. स्वतःतील गुण-दोष समजून घेतले पाहिजे. आणि स्वतःच्या स्वभावात आणि वागण्यात सुधारणा करण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. या अनुषंगाने माझी एक कविता आहे या कवितेनेच या लेखाचा शेवट करणे योग्य वाटते.
करा सुधारणा 'स्व'ची........
कोण चांगले-वाईट...?
नका ठरवू क्षणात
दृष्टिकोन ज्याचा-त्याचा
तशी प्रतिमा डोळ्यात....
दुसऱ्याचे गुण-दोष
फक्त समज मनाची
व्यर्थ अंदाज माणसा
नसे पारख स्वतःची....
जसे विचार जयांचे
तसा हेतू आणि ध्यास
जशा घडती घटना
तसा वागतो माणूस....
मन, बुद्धी भिन्न-भिन्न
भिन्न विचार साऱ्यांचे
काय तुलना कुणाशी...?
व्यक्तिमत्व ज्याचे त्याचे....
भिन्न माणसा सोबत
असे वागणे निराळे
बरे आणिक वाईट
लोक असती सगळे....
काय पारखता लोका...?
नसे गरज हो त्याची
मन ठेवूनी पवित्र
करा सुधारणा 'स्व'ची....
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
लेखक, कवी, कथाकार, गझलकार

(टिप लेखक हे उत्तम व्याख्याते व निवेदक सुद्धा आहेत.)
No comments:
Post a Comment