अशी साजरी करु होळी......!....
फाल्गुन हा भारतीय सौर वर्षाचा शेवटचा महिना. फाल्गुन पौर्णिमेला भारतात जवळपास सर्वत्र विविध पद्धतीने होळी साजरी केली जाते. अर्थात प्रत्येक भागात या सणाचे महत्व, पार्श्वभूमी, सणाचे नाव, आणि सण साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. या लेखाच्या माध्यमातून होळी या सणाच्या निमित्ताने थोडासा वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न आहे.
महाराष्ट्रात होळी संदर्भाने जी पौराणिक कथा ऐकवली व ऐकली जाते. शिकण्या आणि समजून घेण्याचा विचार केला तर या कथेतून भरपूर काही समजून घेण्यासारखे आहे. आदीदेव विष्णू यांचे निस्सिम भक्त असणारा बाळ प्रल्हाद सातत्याने सत्कर्म करत असतो आणि श्री विष्णूचे "नारायण नारायण" असे नामस्मरण करत असतो. हे त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांना आवडत नाही. बाळ प्रल्हादाचे जपनाम आणि सत्कर्म थांबवण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला जातो. उकळत्या तेलात टाकणे, हत्तीच्या पायाखाली देणे, उंच कड्यावरून ढकलून देणे यासारखे प्रयत्न होतात पण बाळ प्रल्हादाला काहीही होत नाही.
शेवटी अंतिमतः हिरण्यकश्यपूची बहीण होलिका हिला अग्नीमध्ये दहन न होण्याचे वरदान असते. म्हणून नात्याने आत्या असणारी होलिका बाळ प्रल्हादाला मांडीवर घेऊन गवताच्या गंजीवर बसते. गवताच्या गंजीला आग लावली जाते. एवढ्या प्रचंड आगीतही बाळ प्रल्हादाला काहीही होत नाही. मात्र अग्नीदहनापासून संरक्षणाचे वरदान असणारी होलिका मात्र दग्ध होते. ही सांगितली जाणारी पौराणिक कथा सत्य आहे असे माझे मत नाही.
प्रामाणिकपणे चांगले काम आणि चांगले विचार पसरवणाऱ्या व्यक्तीचे कितीही, कसेही वाईट करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वशक्तिमान नियती त्याचे वाईट होऊ देत नाही. सत् प्रवृत्ती संपवण्याच्या प्रयत्नात आणि धुंदीत दुष्ट प्रवृत्ती युगानुयुगे भस्मसात होत आलेली आहे. हा दृष्टिकोन आणि उद्बोधन करण्याचा हेतू या पौराणिक कथेचा असावा. अशी धारणा ठेवून मी पुढचे विचार मांडत आहे. फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा होळी हा सण संपूर्ण भारतीय सौर वर्षातला शेवटचा सण आहे. येणाऱ्या गुढीपाडव्याच्या पहिल्या सणापासून नवीन वर्ष सुरू होणार असते.
म्हणून सरत्या भारतीय सौर वर्षाला निरोप देताना आत्मिक आणि सर्वांगीण परीक्षण झाले पाहिजे. होळी या सणाच्या निमित्ताने प्रत्येक घराघरात आणि प्रत्येक मनामनात आत्मचिंतन झाले पाहिजे. या वर्षात माझे आणि माझ्या कुटुंबाचे कळत-नकळत काय चुकले...? कळत-नकळत आपल्या हातून काय चुकीचे घडले...? कुणाचे मन दुखावल्या गेले...? कुणाशी आपण वाईट वागलो...? काय-काय आणि कसे-कसे समज-गैरसमज होत गेले...? कुणा-कुणापासून आपण दुरावल्या गेलो...? कोणत्या-कोणत्या नात्यात आणि कोणत्या-कोणत्या माणसात दरी निर्माण झाली...? या संपूर्ण वर्षभरात आपण नेमके काय मिळवले आणि काय गमावले...? याचा सर्वांगाने सारासार विचार झाला पाहिजे. फक्त मीच बरोबर आहे आणि असतो. ही धारणा सोडून इतरांच्या भावना आणि इतरांचे विचार त्यांच्या-त्यांच्या धारणा आणि दृष्टिकोनानुसार योग्य असतात. हे समजून घेऊन मग चुकलेल्या सगळ्या गोष्टीचे दहन घराघरात, चौका-चौकात आणि गावागावात पेटवल्या जाणाऱ्या होळी सोबत झाले पाहिजे.
म्हणून केवळ पारंपारिक पद्धतीने होळी फक्त परंपरेने आणि उत्साहाने साजरे करून चालणार नाही. "होळी रे होळी ..... आणि पुरणाची पोळी...."म्हणून भागणार नाही. "बुरा न मानो होली है...| म्हणून एकमेकांना शिव्या देऊन आणि एकमेकांच्या नावाने बोंबलून काही उपयोग होणार नाही. तर या होळी सोबत माझ्या मनातले आणि वर्तनातले सारे दुर्गुण, दुष्कृत्य, दुरविचार, दुस्वप्न नष्ट झाले पाहिजेत. गर्व, अहंकार, द्वेष, तिरस्कार, दुसऱ्याचे वाईट करण्याची भावना यासारखा सर्व दुर्गुण संपले पाहिजेत. मनातील, डोक्यातील, कृतीतील प्रत्येक दुष्ट प्रवृत्ती होलीके प्रमाणे नष्ट झाली पाहिजे. मनात, डोक्यात, कृतीत भक्त प्रल्हादाच्या निर्धाराने आणि निस्सीमतेने सत् प्रवृत्ती रुजली पाहिजे. ज्यांच्या सोबत अहंकाराने, तिरस्काराने, द्वेषाने किंवा कुठल्यातरी गैरसमजाने वाईट वागलो असेल. कुणासोबत काही चुकले असेल. अशा सर्व कृत्याची माफी या सणाच्या निमित्ताने मागता येते आणि मागितल्या गेली पाहिजे. दुरावलेली नाती आणि माणसे नव्या निर्धाराने, तेवढ्याच आत्मीयतेने पुन्हा जवळ आली पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने हा सण आपल्याला समजला आणि त्याचे महत्त्व कळाले असे म्हणता येईल.
होळी.....
फाल्गुनाच्या पौर्णिमेला
सण होळीचा सुंदर
माणसाने माणसाची
ठेवा मनात कदर......
राग, द्वेष, अहंकार
चुकलेली वेडी वाट
करू चिंतन मनाने
चढू सौजन्याचा घाट...
निराशेला दूर सारू
धुळ झटकू आत्म्याची
चुका सुधारू कालच्या
धुळवड आयुष्याची....

दुर्गुणांना संपवूया
घेऊ वसा मंगल्याचा
माणुसकी वाढवूया....
जोडू माणसा माणूस
नष्ट भेदभाव करू
प्रेम, माया, आपुलकी
रंग जिव्हाळ्याचे भरू ....
गुण सारे जोपासूया
हीच अपेक्षा सणाची
रंगूनिया गुणांमध्ये
करू पंचमी रंगाची......
©®श्री. मयूर मधुकरराव जोशी
लेखक, कवी, कथाकार, गझलकार
No comments:
Post a Comment