🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

गलिच्छ राजकारणाला कंटाळून अशोक बागुल यांचा बीआरएस मध्ये प्रवेश


गलिच्छ राजकारणाला कंटाळून अशोक बागुल यांचा बीआरएस मध्ये प्रवेश

श्रीरामपूर -: काँग्रेसचा नाकर्तेपणा, राष्ट्रवादी व शिवसेनेचे गलिच्छ राजकारण तसेच भाजपाची शेतकऱ्यांप्रति असलेली उदासिनता यासर्व बाबींना कंटाळून येथील मुळा प्रवराचे माजी संचालक अशोक बागुल यांनी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्यावतीने त्यांच्यावर राहुरी, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, राहाता, संगमनेर व अकोले या तालुक्याची जबाबदारी देण्यात आली असून लवकरच जिल्हा विभाजनासाठी व श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीसाठी मोठे जनआंदोलन उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बागुल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये व संपूर्ण देशामध्ये अशोभनीय आणि आणि अनैतिक अनैतिक राजकारणाची चर्चा सुरू आहे. राजकारणी नेत्यांची हुजरेगिती करणाऱ्यांची जणू काही फौजच तयार केली आहे. मोजके कार्यकर्ते सोडले तर महाराष्ट्रातील जनता अशा गलिच्छ राजकारणाला आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत शिव्या घालत आहे. कुठेही नैतिकता, सामाजिक मूल्य जोपासलेले जात नाही. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस लांबल्याने रब्बी पिकावर पर्यायाने शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. शेतकरी हैराण झाला आहे. विशेषतः मराठवाडा विदर्भ येथील कोरडवाहू शेती करणारा शेतकरी याचा खरीप हंगाम वाया जातो की काय या चिंतेत असताना महाराष्ट्रात सत्ता संघर्ष चालू आहे. हे सर्वसामान्यांना विचार करायला लावणारी बाब आहे. अशा काळामध्ये शेतकऱ्यांच्या प्रति कोणतीही भूमिका घ्यायला महाराष्ट्रातील प्रस्थापित पक्ष व नेते तयार नाहीत. कालपर्यंत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे, तोंड लपवून बोलणारे आपले सहकारी चक्क भाजपच्या तंबूत गेले याबद्दल काँग्रेसचा एकही नेता शब्द काढायला, बोलायला तयार नाही. कारण स्पष्ट आहे की कोणी कोणत्याही पक्षात जा काँग्रेसची तक्रार नाही. पण बीआरएस पक्षाने दलित, अल्पसंख्यांक, शेतकरी आणि ओबीसी समाजाला शेतकऱ्यांना बरोबर घेऊन बी आर एस पार्टी आपकी बार किसान सरकार असा नारा देत महाराष्ट्रात नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये आता पार्टीने कामाला सुरुवात केली आहेअशी माहिती अशोक बागुल यांनी दिली आहे.

बागुल यांच्याकडे श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव, अशा तालुक्याची धुरा सांभाळण्याचे काम दिले असून पार्टीमध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते सामील करण्याची जबाबदारी त्यांना दिली आहे.  या प्रवेशाप्रसंगी बीआरएस नेते बाळासाहेब सानप, प्रदेशाध्यक्ष माणिकराव कदम, पुणे अध्यक्ष बी जे देशमुख लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अहमदनगरचे घनश्याम शेलार, पुणे येथील काळभोर  आदी मान्यवर उपसथित होते. श्रीरामपूर मध्ये लवकरच भव्य पक्ष प्रवेश सोहळा व पक्षाची ध्येयधोरण व जाहीर सभा होणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Comments system