🔴 BREAKING
📰 News E Gram मध्ये आपले स्वागत आहे | 🌦️ अहमदनगर हवामान | 📈 शेअर मार्केट अपडेट | 🟡 सोने-चांदीचे भाव | 🏏 क्रीडा | 🎬 मनोरंजन
🌦️ जिल्हा हवामान
हवामान लोड होत आहे...

श्रीरामपूर शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवणे व शहरातील नविन रस्ता तात्काळ व्हावे - बहुजन समाज पार्टीचे अहमदनगर उत्तर जिल्हा महासचिव प्रकाश अहिरे यांची मागणी


                                    

श्रीरामपूर (वार्ताहर) श्रीरामपूर शहरातील सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झालेली आहे. परंतु श्रीरामपूर नगरपरिषदेस याचे काहीही देणेघेणे नाही त्यातल्या त्यात संगमनेर-नेवासा, नेवासा-संगमनेर रस्ता याची तर अत्यंत दुरावस्था झालेली आहे या रस्त्यावर दररोज एक अपघात घडत असतो या रस्त्यावर अपघातांची मालिकाच सुरु झाली आहे त्यातच या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढलेली आहे सध्या ऊस गळीत हंगाम सुरु असल्याने या रस्त्याने ऊस वाहतुक करणारे ट्रॅक्टर त्यास लावलेल्या दोन ट्रॉल्यांवर ऊस वाहतुक करताना दिसतात ते अत्यंत संथ गतीने चालतात या रस्त्यावर भयंकर असे खड्डे असल्यामुळे मागून येणा-या वाहनधारकांना या खड्ड्डयांचा अंदाज येत नाही व वाहन पुढे नेत असतांना अचानकपणे खड्डा चुकवितांना व एखादा पादचारी रस्त्यावरुन जाताना त्यास या वाहनाची धडक बसून मोठा अपघात होतो हे सर्व या खराब रस्त्यांमूळे घडत आहे. खड्डे एवढे मोठे आहे की त्यामध्ये गाडी अडकून अंध, अपंग, वयोवृध्द व शहरातील महिला भगिनी व नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील चारही कोप-यामध्ये रस्ते अतिशय खराब आहे त्याचप्रमाणे शिवाजी चौक, सय्यद बाबा चौक, म. गांधी चौक येथील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे बंद पडलेली असल्याने चौका-चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत या खराब रस्त्यांमुळे अनेक नागरीकांना आपले प्राण गमवावे लागले आहे तरी नगरपरिषदेने तात्काळ नेवासा रोड, शिवाजी रोड, संगमनेर रोड व शहरातील खड्डे मुक्त श्रीरामपूर करावे जेणे करून मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागणार नाही शासनाकडून आलेला रस्ते कामाच्या निधीमधून किंवा इतर निधीमधून तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुजवावेत तसेच संपूर्ण रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करावे, स्टिकर पांढरे प‌ट्टे मारावेत, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत करावी नुकताच मोठा अपघात झालेला आहे त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झालेला आहे याचे गांभीर्य ओळखून नगरपरिषदेने तात्काळ खड्‌डेमुक्त श्रीरामपूर करावे अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे उत्तर अहमदनगर जिल्हा महासचिव श्री प्रकाश अहिरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली असून  निवेदनाच्या प्रती त्यांनी प्रशासक श्रीरामपूर नगरपरिषद श्रीरामपूर, उपविभागीय अधिकारी श्रीरामपूर, जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा प्रशासन अधिकारी साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर, तहसिलदार साहेब श्रीरामपूर यांचेकडे दिले असून केलेल्या कारवाईची प्रत पंधरा दिवसांचे आत मिळावी अशी मागणी श्री प्रकाश अहिरे यांनी केली आहे.

प्रकाश सुखदेव अहिरे महासचिव बहुजन समाज पार्टी उत्तर अहमदनगर जिल्हा...                                                                                                    

No comments:

Post a Comment

Comments system